घरदेश-विदेशतिहेरी तलाकच्या अध्यादेशाला कॅबिनेटची मंजूरी

तिहेरी तलाकच्या अध्यादेशाला कॅबिनेटची मंजूरी

Subscribe

तिहेरी तलाक संदर्भातील अध्यादेशाला केंद्रसरकारने मंजूरी दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात कॅबिनेटची एक बैठक बुधवारी पार पडली त्यावेळी याला मंजूरी देण्यात आली.

तिहेरी तलाक संदर्भात हैदराबादमधील एका महिलेचे प्रकरण समोर आले असताना आता एक आनंदाची बातमी देखील आली आहे. तिहेरी तलाक संदर्भातील अध्यादेशाला केंद्र सरकारने मंजूरी दिली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संदर्भात कॅबिनेटची एक बैठक आज (बुधवारी) पार पडली त्यावेळी याला मंजूरी देण्यात आली. या आधी तिहेरी तलाकला लोकसभेमध्ये मंजूरी देण्यात आली. पण राज्यसभेत अद्याप याला मंजूरी मिळालेली नाही.

जामीन मिळणार?

तिहेरी तलाक संदर्भात जामीनावरुन बराच गोंधळ झाला होता. पण दोषी पतीची बाजू ऐकल्यानंतरच जामीनाची तरतुद करण्यात येणार असल्याची माहिती रवी शंकर प्रसाद यांनी पत्रकार  परिषदेत दिली आहे. या शिवाय मुलाचे अधिकार देण्यावरुन ही त्यांनी अधिक माहिती दिली.

- Advertisement -


शरीयतच्या नियमांमध्ये हस्तक्षेप

‘तिहेरी तलाक’ आणि ‘निकाह हलाला’ या मुस्लिम प्रथांविरोधात मुस्लिम महिलांनी आवाज उठवला होता. त्यानंतर तिहेरी तलाक गुन्हा असून पतीला अटक करण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली होती. पण आता अजामीनपत्र गुन्हा असूनही आता मॅजिस्ट्रेटकडून आता आरोपी पतीला जामीन मिळणे शक्य होणार आहे. पण पतीला अटक करुन काहीच होणार नाही असा आरोप मुस्लिम महिलांनी केला होता. तर दुसरीकडे हे बदल शरीयतच्या नियमांमध्ये हस्तक्षेप आहे, असे सांगत मुस्लिम संघटनांनी त्याला विरोध केला होता.

वाचा – तिहेरी तलाक विधेयक आज राज्यसभेत मांडणार

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -