ओडिशात मोठे राजकीय फेरफार, मंत्रिमंडळाचा राजीनामा

ओडिशात मोठे राजकीय फेरफार, मंत्रिमंडळाचा राजीनामा

ओडिशात मोठे राजकीय फेरफार, मंत्रिमंडळाचा राजीनामा

ओडिसात मोठी राजकीय राजकीय भूकंप झाला आहे. ओडिशाच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. ब्रजराजनगर पोटनिवडणुकीत बिजू जनता दलाचा (बीजेडी) झालेला मोठा विजय आणि नवीन पटनायक सरकारच्या पाचव्या कार्यकाळाला तीन वर्षे पूर्ण झाल्यामुळे राज्य मंत्रिमंडळात संभाव्य फेरबदल होऊ शकतात, असे सांगण्यात येत आहे.

सरकारची बदनामी करणाऱ्या मंत्र्यांना पक्षातून काढनार? –

मंत्रिमंडळात फेरबदल आणि पक्ष संघटनेत बद्दल हे दोन महत्वाचे बदल सत्ताधारी पक्ष बीजेडी 2024 च्या सार्वत्रिक आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी करणार आहे. फेरबदलावेळी पक्षनेतृत्वाकडून पक्षातील नेत्यांच्या कामाचा विचार केला जाऊ शकतो. वादात अडकलेल्या आणि राज्य सरकारची बदनामी करणाऱ्या मंत्र्यांना पक्षातून काढून टाकले जाण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

नवीन आणि तरुण आणि अनुभवी नेत्यांना एकत्रि संधी –

नवीन मंत्रिमंडळ तरुण आणि अनुभवी नेत्यांना एकत्रित करून बनवले जाऊ शकते. 2024 च्या सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेऊन काही मंत्र्यांना वगळले जाण्याची शक्यता आहे. या मत्र्यांना त्यांना प्रमुख संघटनात्मक कार्यभार सोपवले जाऊ शकतो. 2024 च्या निवडणुका लक्षात घेऊन मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या टीमसाठी नवीन चेहरे निवडले जातील. काही जिल्ह्यांना मंत्रिमंडळात अधिक प्रतिनिधित्व मिळण्याची शक्यता आहे. नवीन कॅबिनेट मंत्री रविवारी राजभवनात शपथ घेऊ शकतात, असे सूत्रांनी सांगितले आहे.

 

First Published on: June 4, 2022 6:10 PM
Exit mobile version