चीनची दादागिरी खपवून घेणार नाही – लष्करप्रमुख

चीनची दादागिरी खपवून घेणार नाही – लष्करप्रमुख

युध्दजन्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी, चीनला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य पूर्णपणे सज्ज आहेत. अशी माहिती लष्करप्रमुख जनरल एम.एम.नरवणे यांनी दिली. ते सर्वोच्च नेतृत्वाला लडाखमधील परिस्थितीची आणि भारतीय सैन्याच्या तयारी याविषयी बोलत होते. पूर्व लडाखमधील नियंत्रण रेषेजवळील भागांना जनरल एम.एम.नरवणे  यांनी भेट दिली.

या भेटीनंतर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांना परिस्थितीची कल्पना दिली. टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार जनरल एम.एम.नरवणे यांनी नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर त्यांनी शुक्रवारी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली.

भारत सज्ज

भारतीय सैन्याने तयारीसाठी कोणतीही कमतरता ठेवलेली नाही. बोफोर्स, हॉवित्झर तोफा, टी-९०, टी-७२ रणगाडे तैनात केले आहेत. इंडियन एअर फोर्सचे सुखोई-३० एमकेआय आणि मिग-२९ या फायटर विमानांची आकाशात नियमित गस्त सुरु आहे. त्याशिवाय चिनूक, अपाची हेलिकॉप्टरच्या फेऱ्याही सुरु आहेत. त्याचबरोबर गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर परिस्थिती आता अधिक चिघळली आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर तणाव असल्याने पुन्हा गलवान सारखा संघर्ष होण्याची शक्यता नाकारता येत नाही. पँगाँग आणि गलवान खोऱ्यात हा तणाव जास्त आहे.


हे ही वाचा – कोरोनाबाबत WHO ने जगाला दिली गुड न्यूज, लसीबाबत केली मोठी घोषणा!


 

First Published on: June 27, 2020 12:44 PM
Exit mobile version