Omicron Variant: चिंताजनक! देशात ओमिक्रॉनसह कोरोनाबाधितांमध्ये वाढ; आतापर्यंत २३६ ओमिक्रॉनबाधितांची नोंद

Omicron Variant: चिंताजनक! देशात ओमिक्रॉनसह कोरोनाबाधितांमध्ये वाढ; आतापर्यंत २३६ ओमिक्रॉनबाधितांची नोंद

देशात ओमिक्रॉनसह कोरोनाचा प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. एकाबाजूला देशात ओमिक्रॉनचे रुग्ण वाढत आहेत, तर दुसऱ्या बाजूला कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यामुळे वर्षा अखेरीस देशात चिंता वाढताना दिसत आहे. देशात २३ नव्या ओमिक्रॉनबाधितांची वाढ झाली असून आतापर्यंत एकूण संख्या २३६वर पोहोचली आहे. यापैकी आतापर्यंत १०४ ओमिक्रॉन रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात सर्वाधिक ओमिक्रॉनबाधित रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत.

तसेच देशात दुसऱ्या बाजूला गेल्या २४ तासांत १ हजार १७८ कोरोना रुग्णांमध्ये वाढ झाली असून ७ हजार ४९५ रुग्णांची नोंद झाली आहे. तर ४३४ जणांचा मृत्यू झाला आहे आणि ६ हजार ९६० रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात सध्या ७८ हजार २९१ कोरोनाबाधित रुग्ण सक्रीय आहेत. आतापर्यंत देशातील ३ कोटी ४२ लाख ८ हजार ९२६ जण कोरोनामुक्त झाले असून ४ लाख ७८ हजार ७५९ जण मृत्यूमुखी पडले आहेत. आतापर्यंत १ अब्ज ३९ कोटी ६९ लाख ७६ हजार ७७४ जणांचे लसीकरण झाले आहे.

कोणत्या राज्यात किती ओमिक्रॉनबाधित आढळले?

महाराष्ट्र – ६५ रुग्ण – ३५ रुग्ण डिस्चार्ज
दिल्ली – ६४ रुग्ण – २३ रुग्ण डिस्चार्ज
तेलंगणा – २४ रुग्ण
राजस्थान – २१ रुग्ण – १९ रुग्ण डिस्चार्ज
कर्नाटक – १९ रुग्ण – १५ रुग्ण डिस्चार्ज
केरळ – १५ रुग्ण
गुजरात – १४ रुग्ण – ४ रुग्ण डिस्चार्ज
जम्मू आणि काश्मीर – ३ रुग्ण – ३ रुग्ण डिस्चार्ज
आंध्र प्रदेश – २ रुग्ण – १ रुग्ण डिस्चार्ज
ओडिसा – २ रुग्ण
उत्तर प्रदेश – २ रुग्ण – २ रुग्ण डिस्चार्ज
चंदीगड – १ रुग्ण
लडाख – १ रुग्ण
तामिळनाडू – १ रुग्ण
उत्तराखंड – १ रुग्ण
पश्चिम बंगाल – १ रुग्ण – १ रुग्ण डिस्चार्ज


हेही वाचा – ‘यामुळे’ Booster Doseबाबत विकसित देशांना WHOने दिला संयम ठेवण्याचा डोस


 

First Published on: December 23, 2021 10:42 AM
Exit mobile version