घरताज्या घडामोडी'यामुळे' Booster Doseबाबत विकसित देशांना WHOने दिला संयम ठेवण्याचा डोस

‘यामुळे’ Booster Doseबाबत विकसित देशांना WHOने दिला संयम ठेवण्याचा डोस

Subscribe

अनेक देशांमध्ये कोरोनासह ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. त्यामुळे अमेरिका, ब्रिटनसारख्या देशांमध्ये रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. म्हणून विकसित देशांनी कोरोना लसीकरणानंतर बूस्टर डोस वेगाने देण्यास सुरुवात केली आहे. पण यादरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने बूस्टर डोस देणाऱ्या देशांना महत्वाचा सल्ला दिला आहे. बूस्टर डोसच्या देण्याबाबत संयम ठेवण्याचे आवाहन डब्ल्यूएचओने केले आहे. डब्ल्यूएचओचे प्रमुख टेड्रोस एडनॉम घेब्रायियस बुधवारी माध्यमांशी बोलताना विकसित देश बूस्टर डोसच्या उपयोगाच्या मागे लागण्याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

बूस्टर डोस देणाऱ्या देशांना WHOने का दिला असा सल्ला?

WHOने असा सल्ला देण्यामागचा त्यांचा तर्क आहे की, जगातील इतर देशांमध्ये लसीच्या अतिरिक्त मागणीमुळे त्याचा पुरवठा कमी होईल, ज्यामुळे कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये लसीचे आवश्यक डोस देण्यात अडथळा निर्माण होईल आणि यामुळे महामारीचा धोका अजून बराच काळ राहिल. सध्या ज्यांना अजूनही लसीचा एकही डोस मिळालेला नाही, अशा लोकांना लसीकरणाची गरज आहे.

- Advertisement -

त्यानंतर पुढे टेड्रोस म्हणाले की, कोणताही देश महामारीपासून बचाव करण्याच्या प्रक्रियेला बूस्ट करू शकत नाही. यशिवाय WHOने कोरोना लस पोहोचवण्यात असमानतेबद्दल विकसित देशांची निंदा केली आहे. ते म्हणाले की, जर कोरोना न थांबवता पसरवू दिला तर काही महिन्यांत नव्या व्हेरिएंट्सना सामोरे जावे लागले.

दरम्यान बूस्टर डोसमुळे महामारी संपुष्टात येण्याऐवजी वाढले, कारण ज्यांच्याकडे पहिल्यापासून उच्चस्तरीय लसीकरणाची पातळी आहे, तिथे व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटला म्युटेट होण्याची संधी मिळते, असे टेड्रोस यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वीच टेड्रोस यांनी लसीकरण केलेल्या निरोगी लोकांना बूस्टर डोस न घेण्याची आवाहन केले होते. कारण जगातील ४० टक्के लोकांना अजूनही कोरोनाची लस मिळालेली नाही.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: १२ वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वय असलेल्यांचा मृत्यूचा धोका होणार कमी: Pfizerच्या Paxlovid गोळीला मंजूरी


 

Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -