Omicron Treat: आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ७ दिवसांचे होम आयसोलेशन बंधनकारक; केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स

Omicron Treat: आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ७ दिवसांचे होम आयसोलेशन बंधनकारक; केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स

Omicron Treat: आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ७ दिवसांचे होम आयसोलेशन बंधनकारक; केंद्राच्या नव्या गाईडलाईन्स

देशात कोरोनाचा आणि ओमिक्रॉनचा फैलाव वेगाने होत आहे. पुन्हा एकदा देशभरात चिंतेचे वातावरण पसरले आहे. आज देशात १ लाखांहून अधिक नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली तसेच एकूण ओमिक्रॉनबाधितांची संख्या ३ हजार पार झाली. सध्या ओमिक्रॉनचा धोका दुप्पटीने वाढ आहे, त्यामुळे सरकार खूप चिंतेत आहे. त्यामुळे कोरोना आणि ओमिक्रॉनचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सातत्याने गाईडलाईन्स जारी करत आहे. आता केंद्र सरकारने परदेशातून येणाऱ्या सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी ७ दिवस होम आयसोलेशन बंधनकारक केले आहे. म्हणजेच जो कोणी परदेशातला प्रवासी भारतात येतो त्याला सर्वात पहिल्यांदा ७ दिवस होम आयसोलेशनमध्ये राहावे लागणार आहे. (central Government mandates all international arrivals to undergo home quarantine for 7 days)

काल, गुरुवारी इटलीतून पंजाबमधील अमृतसरच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर आलेल्या चार्टर्ड फ्लाईटमध्ये १२५ प्रवाशी कोरोना पॉझिटिव्ह आले होते. त्याच्या दुसऱ्या दिवशीच केंद्राने आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी गाईडलाईन्स जारी केल्या आहेत. या गाईडलाईन्सनुसार आंतरराष्ट्रीय प्रवाशी ७ दिवस होम आयसोलेशनमध्ये राहिल्यानंतर ८व्या दिवशी प्रवाशाची आरटी-पीसीआर चाचणी केली जाईल. सरकारकडून जारी करण्यात आलेल्या आदेशात म्हटले आहे की, नवीन स्टँडर्ड ऑपरेंटिंग प्रोसीजर ११ जानेवारीपासून पुढील आदेश येईपर्यंत लागू राहिल.

माहितीनुसार सध्या जितके कोरोनाबाधित आढळत आहे, त्याच्यामधील जास्त करून परदेशातील प्रवासी आहेत. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी केंद्र सरकारकडून ही नवीन गाईडलाईन्स जारी करण्यात आली आहे.

नव्या गाईडलाईन्स काय आहेत?


हेही वाचा – Covid-19 : यावेळी कोरोना देतोय डोक्याला कमी ताप, सीटी स्कॅनमधून झाला खुलासा


 

First Published on: January 7, 2022 5:18 PM
Exit mobile version