एक नेता, एक संघटना , एक पक्ष खूप मोठे बदल घडवू शकत नाही; सरसंघचालकांचे प्रतिपादन

एक नेता, एक संघटना , एक पक्ष खूप मोठे बदल घडवू शकत नाही; सरसंघचालकांचे प्रतिपादन

Mohan Bhagwat

एक नेता, एक संघटना, एक पक्ष समाजात खूप मोठा बदल घडवू शकत नाही. हेा बदल तेव्हाच घडेल, जेव्हा एक सामान्य माणूस त्या बदलासाठी पुढाकार घेईल, असं प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले आहे. विदर्भ साहित्य संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित संस्थांची शतकोत्तर आव्हाने या व्याख्यानमालेच्या समारोप समारंभात ते मंगळवारी बोलत होते. यावेळी भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकोत्तर आव्हानांवर एक प्रकाश टाकला.

यावेळी डॉ. भागवत म्हणाले की, देशासमोरील कितीही मोठ्या आव्हानांचा सामना एकटा नेता करु शकत नाही हे सांगत त्यांनी 1857 देशाच्या स्वातंत्र्य युद्धाची आठवण करुन दिली. 1857 पासूनच देशात स्वातंत्र्य युद्ध झाले. यावेळी अनेकांनी आपले बलिदान दिले, आयुष्य खर्ची घातले. त्यामुळेच देशाता स्वातंत्र्य भेटले. सामान्य माणूस जेव्हा रस्त्यावर उतरला तेव्हाच हा लढा यशस्वी झाला. असेही त्यांनी नमूद केले.

तर लोक संघाकडेही सत्ता सोपवायला मागे पुढे पाहणार नाहीत

देशावर अनेक परकीय शासकांनी आक्रमण केले. त्यामुळे समाजात परावलंबत्वाची भावना अद्याप काय आहे. त्यामुळे देशाची जनता भले करण्याची मत्तेदारी कधी तरी त्या ठेकेदाराला देत असते. संघ लोकप्रिय झाल्यास लोक संघालाही सत्ता सोपवण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. पण संघ तसे करणार नाही, म्हणजेच संघ कधीही सत्ताकारणात येणार नाही. कोणत्याही संघटनेला दीर्घकाळ कार्यरत राहायचे असल्यास त्या संघटनेतील नेते आणि कार्यकर्ते दोघांनी दक्ष राहून काम करणे गरजेचे असते. तसते समाजानेही विविध आव्हानांचा सामना करण्यासाठी सरकार, संस्था वा संघावर अवलंबून न राहता स्वावलंबी झाले पाहिजे. असंही डॉ. भागवत म्हणाले.


नितीश कुमार 8 व्यांदा होणार मुख्यमंत्री, तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री: आज दुपारी शपथविधी सोहळा


First Published on: August 10, 2022 9:35 AM
Exit mobile version