नितीश कुमार 8 व्यांदा होणार मुख्यमंत्री, तर तेजस्वी यादव उपमुख्यमंत्री: आज दुपारी शपथविधी सोहळा

bihar nitish kumar will take the oath of chief minister tejashwi yadav deputy chief minister

बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप पाहायला मिळाला. नितीशकुमार यांनी भाजपचं ऑपरेशन कमळ बिहारमध्ये यशस्वी होऊ दिले नाही, त्यांनी भाजपसोबतची युती तोडून बिहारचे सरकार खाली पाडले. यानंतर नितीशकुमार यांनी आरजेडीसोबत युती स्थापन केली. यानंतर आज जेडीयूचे ज्येष्ठ नेते नितीश कुमार मुख्यमंत्री आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत.

भाजपसोबतची युती तोडल्यानंतर नेते नितीश कुमार यांनी सात पक्षांच्या महागठबंधनसोबत जाण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये तेजस्वी यादव यांचा आरजेडी आणि इतर विरोधी पक्ष आहेत. दरम्यान आज दुपारी 2 वाजता राजभवनावर नितीशुकुमार हे मुख्यमंत्री आणि तेजस्वी यादव उपमुख्यंत्री पदाची शपथ घेतील. त्यानंतर दोन सदस्यीय मंत्रिमंडळात आणखी मंत्र्यांचा समावेश केला जाईल.

नितीश कुमार यांनी काल राज्यपाल फागू चौहान यांची भेट घेत आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर नितीशकुमार यांनी आरजेडीच्या मदतीने आठव्यांदा राज्यात सरकार स्थापन करण्याचा दावा केला. नितीशकुमार यांनी मंगळवारी दोनदा राज्यपालांची भेट घेतली होती. एनडीए आघाडीचे नेतृत्व करत त्यांनी पहिल्यांदाच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. तर दुसऱ्यांदा तेजस्वीसह विरोधी महाआघाडीच्या इतर मित्रपक्षांसह राजभवनात जाऊन 164 आमदारांच्या समर्थनाची यादी राज्यपालांना सादर केली.

हेही वाचा : बिहारमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा, चिराग पासवान यांची राज्यपालांकडे मागणी

राजीनामा पत्र सादर केल्यानंतर, कुमार महागठबंधनच्या आमदारांच्या पाठिंब्याचे पत्र घेण्यासाठी राबडी देवी यांच्या घरी गेले आणि तेथून राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांच्यासह नवीन सरकार स्थापनेचा दावा करण्यासाठी राज्य भवनात गेले.

सध्या बिहार विधानसभेत 242 सदस्य आहेत आणि बहुमत मिळवण्याचा मॅजिक आकडा 122 आहे. जे त्यांनी साध्य केले आहे. त्यांच्यासोबत JDU चे 45 आमदार आहेत आणि त्यांना एका अपक्ष आमदाराचा पाठिंबा आहे. तर आरजेडीचे 79 आमदार आहेत. काँग्रेसकडे 19, तर सीपीआय-एमएलकडे 12 आमदार आहेत, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (सीपीआय) प्रत्येकी दोन आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष (सीपीआय-एम) यांनीही त्यांना पाठिंब्याची पत्रे दिली आहेत. याशिवाय हिंदुस्थानी अवाम मोर्चाचे चार आमदारही कुमार यांच्यासोबत आहेत.

दरम्यान मागील वर्षांपासून बिहारमध्ये सत्तेत असलेला जनता दल युनायटेड (जेडीयू) आणि भारतीय जनता पक्ष (भाजप) यांच्यातील राजकीय वाद शिगेला पोहोचला होता. त्यानंतर नितीश कुमार यांनी हे पाऊल उचलले आहे.
केंद्रीय मंत्री अमित शहा हे सातत्याने जेडीयूमध्ये फूट पाडण्याचे काम करत असल्याचे नितीश कुमार यांचे मत आहे. नितीश कुमार यांनी पक्षाचे माजी नेते आरसीपी सिंह हे अमित शहा यांचे प्यादे म्हणून काम करत असल्याचा आरोप केला होता. तर बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यावर जनतेच्या जनादेशाचा अपमान आणि विश्वासघात केल्याचा आरोप भाजपने केला आहे.

हेही वाचा : बिहारमध्ये सरकार कोसळलं, नितीश कुमारांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा

त्याचवेळी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि बिहारचे राज्यसभा खासदार सुशील मोदी यांनी नितीश कुमार यांना सल्ला दिला आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘ नितीश कुमार यांना भाजपसोबत सत्तेत असताना जो सन्मान मिळाला तो आरजेडीकडून मिळणार नाही, जास्त जागा असूनही आम्ही त्यांना मुख्यमंत्री केले आणि त्यांचा पक्ष फोडण्याचा कधीही प्रयत्न केला नाही. ज्यांनी आमचा विश्वासघात केला त्यांनाच आम्ही तोडले. महाराष्ट्रात शिवसेनेने आमचा विश्वासघात केला असून त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागणार आहेत.


एक दहावी पास, तर डॉक्टरेट; महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील ‘हे’ आहेत सर्वात गरीब आणि श्रीमंत मंत्री