झाडाला वाचवण्यासाठी तरूणाने दिली वादळाशी झुंज, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

झाडाला वाचवण्यासाठी तरूणाने दिली वादळाशी झुंज, व्हिडीओ पाहून व्हाल थक्क

झाडं आणि पर्यावरणाविषयी अनेक प्रकारच्या चर्चा केल्या जातात. झाडं तोडल्यानंतर सुद्धा काही जणांच्या भावना दुखावत नाहीत. तर काही लोकं इतकी पर्यावरण प्रेमी असतात की, आंदोलन करण्यासाठी ते नेहमीच तयार असतात. पण आज तुम्हाला आम्ही एक वेगळचं दृश्य दाखवणार आहोत. ते यापेक्षाही उलटं आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरूण झाडाला वाचवण्यासाठी वादळाशी झुंज देताना पहायला मिळत आहे.

पाहा हा व्हिडिओ


पावसाळ्यात वादळ आल्यास तुम्ही काय करता? साहजिकच सुरक्षित जागा शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करता, पण व्हिडिओत दिसणारे लोकं वेगळ्याच मातीचे आहेत. वादळात स्वतःला वाचवण्यापेक्षा त्याला आपल्या केळीच्या झाडाची जास्त काळजी वाटत आहे. पावसाळ्यात सोसाट्याचा वारा आल्यानंतर केळीचं झाड पडणार होतं. मात्र, एका व्यक्तिने या झाडाला वाचवण्याचा प्रयत्न केला आहे. एवढ्या वादळात झाडाला धरून ठेवल्याने स्वतःला इजा होऊ शकते याचीही या व्यक्तीला काळजी वाटली नाही.

हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. झाडे वाचवण्याच्या या तरुणाच्या भावनेला अनेक जण सलाम करत आहेत. काही यूजर्सने लिहिले आहे की, ही व्यक्ती झाड नाही तर आमचे भविष्य वाचवत आहे.


हेही वाचा : पाटण्यात विमानाला आग; थोडक्यात बचावले १८५ प्रवासी


 

First Published on: June 19, 2022 4:12 PM
Exit mobile version