घरताज्या घडामोडीपाटण्यात विमानाला आग; थोडक्यात बचावले १८५ प्रवासी

पाटण्यात विमानाला आग; थोडक्यात बचावले १८५ प्रवासी

Subscribe

बिहारची राजधानी पाटणाहून दिल्लीला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात (SpiceJet flight) आग लागल्याची घटना घडली. रविवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली.

बिहारची राजधानी पाटणाहून (Patna) दिल्लीला (Delhi) जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात (SpiceJet flight) आग लागल्याची घटना घडली. रविवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. विमानाच्या इंजिनला (Engine) आग लागल्याची माहिती मिळते. ज्या विमानाला आग लागली त्यामध्ये १८५ प्रवासी होते. सुदैवाने कोणतीही जीवितहानी न झाल्याचे समजते. मात्र या घटनेत आग लागल्याने विमानाचे नुकसान झाले. (SpiceJet Flight From Patna To Delhi Caught Fire Safe Landing)

मिळालेल्या माहितीनुसार, या विमानाने रविवारी दुपारी १२.१० वाजता उड्डाण केले होते. विमानाने उड्डाण करताच एका इंजिनमधून धूर निघताना दिसला. त्यानंतर इंजिनला आग लागल्याचे समजताच पाटणा विमानतळावर (Patna Airport) विमानाचे पुन्हा सुरक्षित लँडिंग (Safe Landing) करण्यात आले. या आगीची माहिती मिळताच विमानतळ प्रशासन अलर्ट झाले. विमान उतरल्यानंतर प्रवाशांना विमानातून बाहेर काढले जात आहे.

- Advertisement -

दरम्यान, विमानाच्या इंजिनमध्ये आग कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. प्रवाशांना विमानातून बाहेर काढण्यापूर्वी विमानतळाबाहेर रुग्णवाहिका (Ambulance) तैनात करण्यात आल्या. सद्यस्थितीत विमानातील आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विमानतळावर अग्निशमन दलाच्या अतिरिक्त गाड्याही मागवण्यात आल्या आहेत.

याप्रकरणी, “विमानाला आग लागल्याची माहिती स्थानिकांनी जिल्हा आणि विमानतळ अधिकाऱ्यांना दिली. यानंतर तात्काळ दिल्लीला जाणारे हे विमान परत पाटणा विमानतळावर उतरवण्यात आले. सर्व १८५ प्रवासी सुखरूप आहेत. या तांत्रिक बिघाडा मागचे नेमके कारण शोधण्याचे काम सध्या सुरू आहे’, अशी माहिती पाटण्याचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

- Advertisement -

हेही वाचा – ‘अग्निपथ’ च्या निषेधार्थ रेल्वे गाड्या जाळल्या, एक रेल्वे बनते ‘इतक्या’ कोटींना

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -