Onion prices soar: कांदा रडवतोय ! दर नियंत्रणासाठी सरकारच्या हालचारी सुरू

Onion prices soar: कांदा रडवतोय ! दर नियंत्रणासाठी सरकारच्या हालचारी सुरू

पेट्रोल, डिझेल पाठोपाठच महागलेल्या भाज्यांनी सर्वसामान्यांचे बजेट पुरते कोलमडून टाकले आहे. त्यामध्येच एेन सणासुदीच्या कालावधीत कांद्याचा वाढता भावदेखील सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणू शकतो. कांद्याचे दररोज वाढणारे दर हे सर्वसामान्यांच्या अवाक्याबाहेरचे आहेत. उशिरा का होईना पण सरकारने अखेर कांद्याच्या दरांवर नियंत्रण आणण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. कांद्याच्या वाढत्या भावामुळे एकुणच कांद्याच्या वापरावर मर्यादा आल्या आहेत. सरकारकडून उचलली जाणारी पावले ही दिलासा देणार की तोंडच पाणी पळवणारा हे येत्या दिवसातील कांद्याचे दर ठरवणार आहे.

केंद्रीय अन्न मंत्रालयाच्या स्पष्टीकरणानुसार कांद्याचे सध्याचे दर खूपच अवाक्याबाहेरील नाहीत. म्हणूनच सद्यस्थितीला कांद्याची निर्यात रोखण्याची स्थिती सध्या नाही. कांद्याची किंमत कमी करण्यासाठी सध्या बफर स्टॉक निर्माण केले जात आहेत. सरकारच्या अंदाजानुसार आगामी कालावधीत कांद्याच्या दरामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता तशी कमीच आहे. कारण भारतात खरीप हंगामातील कांद्याच्या उत्पादनानुसार २०२१-२२ इतक्या प्रमाणात पिक आले आहे. यंदा कांद्याचे पिक हे नेहमीपेक्षा अधिक प्रमाणात उपलब्ध होईल असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यंदाच्या अंदाजानुसार गेल्या वर्षीच्या ३७.३८ लाख टन इतक्या कांद्याच्या उपलब्धततेच्या तुलनेत ४३.८८ लाख टन इतका कांदा उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

सरकारचे बफर स्टॉकचे प्रयत्न

खाद्या मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार कांद्याच्या किमती खूपच अवाक्याबाहेर नाहीत. गेल्या वर्षी कांद्याच्या वाढलेल्या किंमतीच्या तुलनेत यंदा या किंमती तुलनेत कमीच आहेत. पण यंदा सरकारनेच कांद्याच्या किंमतीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सध्याच्या कांद्याच्या किंमती पाहता जीवनावश्यक वस्तु अधिनियमाच्या अनुशंगाने तत्काळ यासारख्या उपाययोजनांची आवश्यकता नाही. मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार २१ ऑक्टोबर रोजी कांद्याची किंमत ४१.५ रूपये प्रति किलो इतकी होती. शुक्रवारी दिल्लीत कांद्याची किंमत ४८ रूपये प्रति किलो, मुंबईत ४३ रूपये प्रति किलो, चेन्नईत ३७ रूपये तर कोलकात्यात ५७ रूपये इतकी होती. दिल्लीतील बाजारपेठांमध्ये कांद्याचा भाव ७० रूपये ते ८० रूपयांपर्यंत गेला आहे.

कोण आहे व्हिलन ?

अन्न मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार बफर स्टॉकमधील ८१ हजार टन अतिरिक्त कांदा हा बाजारामध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. ज्याठिकाणी किंमती वेगाने वाढत आहेत, अशा ठिकाणी हा कांदा उपलब्ध करून देण्यात येत आहे. कांद्याच्या उपलब्धतेत वाढ करण्यासाठी आणि कांद्याचे दर नियंत्रण आणण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. सरकारच्या बफर स्टॉकमधील दोन लाख टनच्या बफर स्टॉकमधील एक लाख टन कांदा आता बाजारात उपलब्ध आहे. यंदाच्या खरीप हंगामात ७.८ लाख टन अतिरिक्त कांदा उपलब्ध होईल अशी अपेक्षा आहे. पण या सगळ्या प्रयत्नात अवकाळी पावसाने मात्र अनेक राज्यात कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान केले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, हरियाणा, राजस्थान, मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश या राज्यात ०.५९ लाख हेक्टर क्षेत्रात कांद्याच्या पिकाचे मोठे नुकसान झाले आहे.

कांद्याच्या दरात वाढीची कारणे काय ?

यंदाच्या खरीप हंगामातील कांद्याची कमी झालेली आवक आणि तोक्ते चक्रीवादळाचा तडाखा बफर स्टॉकची लाईफ कमी करण्यासाठी कारणीभूत ठरलेला आहे. वर्ष २०१८ मध्ये यंदाच्या वर्षी कांद्याच्या किंमतीत १०० टक्के अधिक वाढीची शक्यता आहे. महाराष्ट्रात कांद्याच्या लागवडीसाठी आलेल्या अडचणी पाहता कांद्याच्या किंमती या २०२१ साठीच्या किंमती ३० रूपये प्रति किलोग्राम आकडा पार करण्याची शक्यता आहे. कांद्याच्या उपलब्धतेत झालेल्या उशिरामुळेच ऑक्टोबर नोव्हेंबर दरम्यान कांद्याच्या किंमतीत वाढ बघायला मिळत आहे.


हेही वाचा – लासलगावला मुसळधार ; व्यापार्‍यांचा कांदा भिजला, शेतात पाणीच पाणी

First Published on: October 23, 2021 6:29 PM
Exit mobile version