Corona: गेल्या २४ तासात देशामध्ये १ हजार ४०० नवे रुग्ण; आकडा २१ हजार पार!

Corona: गेल्या २४ तासात देशामध्ये १ हजार ४०० नवे रुग्ण; आकडा २१ हजार पार!

देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. कोरोनाग्रस्तांच्या संख्येत देखील दिवसेंदिवस वाढ होत आहे. देशात गेल्या २४ तासात १ हजार ४०० नवे रुग्ण सापडले असून ४१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा २१ हजार पार झाला आहे. तर मृतांचा आकडा ६८१ झाला आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने गुरुवारी सकाळी दिलेल्या आकडेवारीनुसार, सध्या कोरोनाचे १६ हजार ४०० हून अधिक रुग्ण सक्रिय आहेत. तर आतापर्यंत ४ हजारहून अधिक जणांचा डिस्चार्च देण्यात आला आहे. आतापर्यंत देशात कोरोनाग्रस्तांची २१ हजार ३९३ आढळले आहेत.

देशात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांची संख्या ५ हजारहून अधिक झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई कोरोनाचे ३ हजारहून अधिक रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सध्या केंद्रीय मंत्रालयाच्या सहा विशेष पथकांपैकी दोन पथक महाराष्ट्रातील मुंबई आणि पुण्याची पाहणी करण्यासाठी दाखल झाले आहे.

जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या २६ लाखाहून अधिक आहे. तर मृतांचा आकडा १ लाख ८२ हजारहून पार आहे. दिलासा देणारी बाब म्हणजे ७ लाखाहून अधिक जण कोरोनामुक्त झाले आहेत. जगात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण अमेरिका, स्पेन, इटली, फ्रान्स, ब्रिटन या देशात आहे.


हेही वाचा – CoronaVirus: ट्रम्प धमक्या देण्याऐवजी आम्हाला कोरोनाच्या संकटातून वाचवा – इराण


 

First Published on: April 23, 2020 11:03 AM
Exit mobile version