धक्कादायक! चार जणांच्या टोळीने फेसबुकवरून केला ५० महिलांवर लैंगिक छळ

धक्कादायक! चार जणांच्या टोळीने फेसबुकवरून केला ५० महिलांवर लैंगिक छळ

प्रातिनिधिक फोटो

महिलांचे फेक अकाऊंट तयार करून त्यावरून महिलांना फसवणाऱ्या टोळीच्या मुसक्या तमीळनाडू पोलिसांनी आवळल्या आहेत. एका १९ वर्षीय मुलीला फेसबुकवरून ब्लॅकमेल करणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या जवळून मिळालेल्या माहितीने ही गोष्ट उघडकीस आली आहे. तामिळनाडूतील चार जणांना पोलिसांनी अटक केली आहे. मागील काही महिन्यांपासून ही टोळी फेसबुकवरून मुलींना फ्रेंड रिकव्हेस्ट पाठवत होते. मुलींशी मैत्रीकरून त्यांच्याशी अश्लील संभाषण करून ही टोळी मुलींना फसवत होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत तब्बल ५० हून अधिक महिलांची फसवणूक करण्यात आली.

बदनामीच्या भितीमुळे केली नाही तक्रार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी हे याच परिसरातील आहे. मागील अनेक महिन्यांपासून ही टोळी तामिळनाडू येथील महिलांना फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवत होते. यासाठी आरोपी फेसबुकवर मुलींच्या नावांनी फेक अकाऊंट बनवत होते. मुलींशी चॅर्टींगवर मैत्री करून त्यांचे विश्वास संपादन झाल्यानंतर हे आपली खरी ओळख त्यांना सांगत होते. अनेकदा फेसबुकवर अश्लील संवादही ते साधत होते. साधलेल्या अश्लील संभाषणावरून त्यांनी अनेक मुलींना ब्लॅकमेल केले. अनेकदा भेटण्यास येणाऱ्या मुलींचाही त्यांनी विनयभंग केला होता. बदनामीच्या भितीमुळे या मुलींनी तक्रार केलेली नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

First Published on: March 12, 2019 8:59 PM
Exit mobile version