ओवैसींचा सोनिया गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, मॅडम तुमच्याकडून…

ओवैसींचा सोनिया गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, मॅडम तुमच्याकडून…

संग्रहित छायाचित्र

नवी दिल्लीः कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आरोपप्रत्यारोपांची फैरी सुरु आहेत. भाजप आणि कॉंग्रेसमध्ये तर शाब्दिक वाद सुरु झाले आहेत. या वादात आता ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसीं यांनीही उडी घेतली आहे. ओवैसीं यांनी थेट सोनिया गांधी यांच्यावर निशाणा साधला.

सोनिया गांधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या उमेदवाराचा प्रचार करतील अशी अपेक्षा नव्हती. संघाच्या उमदेवाराचा प्रचार करुन तुम्ही मोदींशी कसे लढणार आहात का?, हीच तुमची धर्मनिरपेक्षता आहे का?, जगदीश शेट्टर हे संघाचे आहेत. त्यामुळे त्यांचा प्रचार सोनिया गांधी करतील असे वाटले नव्हते. कॉंग्रेसची वैचारिक लढाई अपयशी ठरली आहे. ते विदूषक, नोकर, गुलाम माझ्यावर आरोप करतात ही शरमेची बाब आहे, असा आरोप ओवैसीं यांनी केला.

गेल्या विधानसभा निवडणुकीत शेट्टर हे भाजपच्या तिकिटावर निवडून आले. आता त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. हुबळी-धारवाड मध्य मतदारसंघातून शेट्टर यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली आहे. शेट्टर यांच्या प्रचारासाठी सोनिया गांधी तेथे गेल्या होत्या. तीन वर्षांनंतर सोनिया गांधी यांनी तेथे सभा घेतली. त्यावरुन ओवैसीं यांनी सोनिया गांधी यांच्यावर टीका केली.

कर्नाटक विधानसभेची रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे. कॉंग्रेसने जाहिरनाम्यात बजरंग दलवर बंदी आणण्याचे आश्वासन दिले आहे. यावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. बजरंग दलची तुलना अतिरेकी संघटनेसोबत केल्याने विश्व हिंदू परिषदने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रायपूर येथील शंकर नगरमध्ये शहीद भगत सिंह चौकात कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचा पुतळा जाण्यात आला. कर्नाटकप्रमाणे छत्तीसगडमध्येही तशाच प्रकारचा निर्णय घेतला जाऊ शकतो, असे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी स्पष्ट केले. बजरंग दलवर बंदी आणण्याचा निर्णय आम्हीही घेऊ शकतो. तूर्त कर्नाटकमधील परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे तेथे तसा जाहिरनामा कॉंग्रेसने प्रसिद्ध केला आहे, असे मुख्यमंत्री बघेल यांनी सांगितले.

First Published on: May 7, 2023 6:04 PM
Exit mobile version