पहले मंदिर फिर सरकार! संसदेच्या आवारात शिवसेनेची निदर्शने

पहले मंदिर फिर सरकार! संसदेच्या आवारात शिवसेनेची निदर्शने

पहले मंदिर फिर सरकार!

हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार, या घोणांची फलक घेऊन आज शिवसेना खासदारांनी संसदेच्या आवारात निदर्शने केली. राम मंदिराच्या मुद्द्यावरुन शिवसेना पुन्हा आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. बुधवारी संसदेबाहेर शिवसेना खासदारांनी हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार अशा घोषणा देत शिवसेना खासदारांनी राम मंदिराच्या समर्थनार्थ घोषणा देत संसद परिसर दणाणून टाकला.

अभी नही तो कभी नही

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली असून या अधिवेशनात शिवसेना राम मंदिराच्या मुद्द्यावरुन आक्रमक झालेली पाहायला मिळत आहे. शिवसेना खासदार चंद्रकात खैरे यांनी लोकसभेत राम मंदिरावर चर्चा घेण्याची मागणी केली आहे. राम मंदिर हा देशातील कोट्यवधी हिंदू लोकांचा आस्थेचा विषय आहे. सरकारने राम मंदिरासाठी कायदा आणावे अशी मागणी खासदार चंद्रकात खैरे यांनी केली आहे. निवडणुकीच्या तोंडावर आम्ही ही मागणी करत नाही तर यापूर्वीपासून आम्ही राम मंदिर बांधाव अशी मागणी करत आहोत आणि आम्ही तो मुद्दा उपस्थित केला आहे.


वाचा – राम मंदिरावरुन देशात दंगली घडवण्याचे कारस्थान – राज ठाकरे


स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय शिवसेनेने २०१८ च्या सुरुवातीलाच घेतला होता. गेल्या दोन महिन्यांत राम मंदिर, हिंदुत्व या मुद्द्यावर शिवसेना आक्रमक झाली आहे. राम मंदिरासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे अयोध्येतही जाऊन आले. या दौऱ्याची चर्चा देशभरात देखील झाली होती. आता पाच राज्यांमधील विधानसभा निवडणुकीत भाजपाचा दणाणून पराभव झाल्याने शिवसेना वधारणार असल्याची चिन्ह दिसून येत आहेत.


वाचा – राम मंदिराला विरोध केल्यास सरकार पाडू – स्वामी


 

First Published on: December 12, 2018 2:10 PM
Exit mobile version