पाकची घुसखोरी; सीमेवर सापडला चौथा बोगदा

पाकची घुसखोरी; सीमेवर सापडला चौथा बोगदा

जम्मू-काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफला आणखी एक भूमिगत बोगदा सापडला आहे. बीएसएफच्या प्रवक्त्याने सांगितले की, शनिवारी पाकिस्तानने दहशतवाद्यांमार्फत घुसखोरी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय सीमेवर आणखी एक भूमिगत बोगदा तयार केल्याचे उघडकीस आले.

हा गुप्त बोगदा हिरानगर सेक्टरच्या पानसर भागात सीमा चौकीवर कारवाई दरम्यान सापडल्याचे त्यांनी सांगितले. दहा दिवसांत बीएसएफला हिरानगर सेक्टरमध्ये अशा प्रकारचा दुसरा भूमिगत बोगदा सापडला आहे. सांबा व कठुआ जिल्ह्यात सहा महिन्यांतील हा चौथा बोगदा आणि दशकातील 10 वा बोगदा आहे. याच सेक्टरच्या बोबियान गावात 13 जानेवारीला 150 मीटर लांबीचा बोगदा सापडला होता. बीएसएफच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, हा नवीन बोगदा पाकिस्तानच्या बाजूने 150 मीटर लांबीचा आणि सुमारे 30 फूट खोल आणि तीन फूट व्यासाचा असल्याचे समजते.

First Published on: January 23, 2021 11:50 PM
Exit mobile version