‘लढाऊ विमानं मागे घ्या, अन्यथा…’; पाकची भारताला धमकी

‘लढाऊ विमानं मागे घ्या, अन्यथा…’; पाकची भारताला धमकी

भारत विरूद्ध पाकिस्तान

बालाकोट हवाई हल्ल्यांनंतर पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद ठेवले आहे. हे हवाई क्षेत्र खुलं करण्यासाठी आता पाकिस्तानकडून अट ठेवण्यात आली आहे. जोपर्यंत भारतीय वायुसेनेच्या हवाई तळांवरून (फॉरवर्ड बेस) लढाऊ विमानांना हटवले जात नाही तोपर्यंत भारताच्या व्यापारी उड्डाणांसाठी पाकिस्तान आपले हवाई क्षेत्र खुले करून देणार नाही. पाकिस्तानचे हवाई उड्डाण खात्याचे सचिव शाहरुख नुसरत यांनी एका संसदीय समितीला ही माहिती दिली. भारतीय हवाई दलाने पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी बालाकोटमध्ये घुसून दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले होते. यानंतर २६ फेब्रुवारी रोजी पाकिस्तानने भारतीय विमानांसाठी त्यांचा हवाई मार्ग बंद केला होता.

‘डॉन न्यूज’ने दिलेल्या वृत्तानुसार गुरुवारी नुसरत यांच्या विभागाने भारतीय अधिकाऱ्यांना सूचना दिली की जोपर्यंत भारताच्या हवाई तळांवरून फायटर विमाने मागे हटत नाहीत, तोपर्यंत पाकिस्तानचं हवाई क्षेत्र भारतासाठी खुलं होणार नाही.

मलेशियामधील पाकिस्तानी विमान सेवाही बंद

पाकिस्तानने हवाई मार्ग बंद केला असल्या कारणाने भारताला सध्या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागत आहे. भारताने पाकिस्तानसाठी आपला हवाई मार्ग सुरु केल्याचा दावा यावेळी फेटाळण्यात आला. थायलंडमधून उड्डाण करणारी पाकिस्तानी सेवा अद्यापही भारतीय हवाई मार्ग बंद असल्याने सुरु करण्यात आलेली नाही. मलेशियामधील पाकिस्तानी विमान सेवाही बंद असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पाकिस्तानने हवाई मार्ग बंद ठेवला असल्या कारणाने भारताला खूप मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

हेही वाचा –

मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला स्थगिती नाही

आरक्षणानंतर सार्वजनिक बांधकाम विभागातील नियुक्त्या जाहीर

First Published on: July 12, 2019 5:42 PM
Exit mobile version