शरणार्थींना पाकिस्तान सामावून घेऊ शकत नाही – इम्रान खान

शरणार्थींना पाकिस्तान सामावून घेऊ शकत नाही – इम्रान खान

पाकिस्तान शरणार्थींना सामावून घेऊ शकत नाही - इम्रान खान

जम्मू-काश्मीरमध्ये संचारबंदी आणि सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे लाखो मुस्लिम भारत सोडतील. परिणामी शरणार्थींची समस्या निर्माण होईल. तसेच आमच्या देशामध्ये आणथी शरणार्थींना सामावून घेण्याची क्षमता नसून जगाने याप्रश्नी हस्तक्षेप करावा अशी विनंतीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली आहे. जीनेव्हामध्ये आयोजित करण्यात आलेल्या शरणार्थींच्या कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.

काय म्हणाले इम्रान खान?

शरणार्थींना सामावून घेण्याची पाकिस्तानची क्षमता नसल्याचे म्हणतानाच इम्रान खान पुढे म्हणाले की, “शरणार्थींमुळे निर्माण होणाऱ्या संकटाची आम्हाला भिती नाही. पण यामुळे दोन अण्वस्त्र संपन्न देशांमध्ये युद्धाची स्थिती उद्भवू शकते.” दरम्यान काही दिवसांपूर्वी इम्रान खान यांनी भारताच्या नरेंद्र मोदी सरकारवर आरोप केला होता. नरेंद्र मोदी यांचे सरकार हिंदू वर्चस्वावादाच्या अजेंड्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे त्यांनी म्हटले होते. एवढेच नाही तर मोदी सरकारने जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यानंतरसुद्धा इम्रान खान यांनी युद्धाची धमकी दिली होती.

हेही वाचा – सुधारित नागरिकत्व कायदा रद्द करा; विरोधी पक्षांची राष्ट्रपतींकडे धाव

इम्रान खान यांना भारताचं सडेतोड उत्तर

दरम्यान भारताच्या नागरिकत्व दुरुस्ती विधेयकावर टिप्पणी करणाऱ्या पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांना भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने सडेतोड उत्तर दिले आहे. भारताच्या अंतर्गत प्रकरणात टिप्पणी करण्यापेक्षा पाकिस्तानमधील अल्पसंख्याकांच्या परिस्थितीकडे पाकिस्तानने लक्ष द्यायला हवे असे भारताचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता रवीश कुमार यांनी सांगितले आहे.

नागरिकत्व सुधारणा विधेयकावर टीका

दरम्यान भारताच्या नागरिकत्व सुधारणा विधेयकावर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी ट्विटरवर ट्विट करत टीका केली होती. भारताच्या नागरिकत्व सुधारणा विधेयकामुळे आंतरराष्ट्रीय मानवी हक्क कायद्याच्या सर्व नियमांचे तसेच पाकिस्तानसोबतच्या द्विपक्षीय कराराचे उल्लंघन होत असल्याचे त्यांनी म्हटले होते.

First Published on: December 17, 2019 7:04 PM
Exit mobile version