पाकिस्तानच्या विळख्यातून मुक्तता करा, बंदुकीने हाकलून द्या; नागरिकांची भारताकडे याचना

पाकिस्तानच्या विळख्यातून मुक्तता करा, बंदुकीने हाकलून द्या; नागरिकांची भारताकडे याचना

पाकिस्तानच्या विळख्यातून आमची मुक्तता करा, अशी याचना पाकव्याप्त काश्मीर म्हणजेच पीओकेच्या नागरिकांनी भारताकडे केली आहे. बाग, नीलम व्हॅली, गिलगिट बाल्टिस्तान येथील लोकांच्या मनात पाकविषयी कटुता निर्माण झाली आहे. जम्मू-काश्मीर विधानसभेत पीओकेसाठी २४ जागा राखीव आहेत. जेव्हा निवडणुका असतात तेव्हा आम्हाला भारतीय संविधानानुसार नावनोंदणी करायची असते, असं राष्ट्रवादी समता पक्षाचे अध्यक्ष प्रा. सज्जाद रझा म्हणाले.

पाकने बंदुकीच्या जोरावर पीओके ताब्यात घेतला. भारतानेही बंदुकीच्या जोरावर त्याला येथून हाकलून द्यावे, असं रझा म्हणाले. भारताने पीओकेत जन्मलेल्या नागरिकांनाही सुविधा द्याव्यात. त्यांना लोकसभा, राज्यसभेवरही स्थान द्यावे, अशी आमची इच्छा असल्याचे ते म्हणाले.

आम्ही पीओकेमध्ये रुग्णालयं, शाळा बांधू. जर पाकिस्तानने हा विकास निधी वापरण्यास मज्जाव केला तर संपूर्ण जगात इस्लामिक देशांची संघटना असलेल्या ओआयसीसमोर त्याचा पदार्फाश करू. भारताने आम्हाला साथ दिली तर आम्ही पाकिस्तानला पाच वर्षांत हाकलून लावू शकते, असेही ते म्हणाले.


हेही वाचा : पाकिस्तानात नमाज पठण सुरू असतानाच मशिदीत स्फोट, १७ जणांचा मृत्यू


 

First Published on: January 30, 2023 5:13 PM
Exit mobile version