पाकिस्तानवर हल्ला कराल तर खबरदार; इम्रान खान यांचा फुत्कार

पाकिस्तानवर हल्ला कराल तर खबरदार; इम्रान खान यांचा फुत्कार

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान

पाकिस्तानवर जर कोणत्या प्रकारचा हल्ला करेल तर आमच्याकडे कोणताही दुसरा पर्याय उरणार नाही. पाकिस्तानलाही हल्ल्याचे जोरदार उत्तर द्यावे लागले असे वक्तव्य पाकिस्तानचे पतंप्रधान इम्रान खान यांनी केले आहे. इम्रान खान यांनी पत्रकार परिषदेत हे वक्तव्य केले आहे. दहशतवादाला पाकिस्तानही बळी पडला आहे. दहशतवादी हल्ल्यात सत्तर हजार पाकिस्तानी मारले गेले. भारतावर हल्ला करून पाकिस्तानला काय फायदा होणार आहे? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. भारताने पुरावे दिल्यास कारवाई करण्याची तयार खान यांनी दाखवली आहे.

काय म्हणाले इम्रान खान

“भारताने उगाच पाकिस्तानवर आरोप करू नये. भारताच्या प्रत्येक कृत्याचे जोरदार उत्तर पाकिस्तान देईल. निवडणुका आल्यावरच पाकिस्तानवर हल्ले केले जातात. पुलवामा हल्ल्याशी पाकिस्तानचा काही संबध नाही. आम्ही दहशतवाद्यांना आसरा देत नाही. युद्ध सुरु करणे हे सोपे आहे मात्र संपणे खूप कठीण आहे. बंदूकीने काश्मीरचा प्रश्न सुटणार नाही.  भारताशी चर्चा करून या प्रश्नावर तोडगा आम्ही काढू. प्रत्येक वेळी पाकिस्तानला टार्गेट केले जाते.” – इम्रान खान

First Published on: February 19, 2019 2:06 PM
Exit mobile version