पाकचे पंतप्रधान अजित डोवालांना घाबरले, अफगाणिस्तानबाबत महत्त्वाची बैठक

पाकचे पंतप्रधान अजित डोवालांना घाबरले, अफगाणिस्तानबाबत महत्त्वाची बैठक

अफगाणिस्तान संदर्भात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज (बुधवार) महत्त्वाची बैठक बोलावली होती. त्यानंतर आता अफगाणिस्तानच्या मुद्द्यावर क्षेत्रीय देशांसह पाकिस्तानने महत्त्वाची बैठक बोलावली आहे. अमेरिका, चीन आणि रूस या तीन देशांसह पाकिस्तान अफगाणिस्तानबाबत महत्त्वाची चर्चा करणार आहे. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद यूसुफ ‘ट्रोईका प्लस’ बैठकांच नेतृत्व करणार आहेत. तसेच रूस, अमेरिका, चीन आणि पाकिस्तानचे प्रतिनिधी अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री आमिर खान मुत्ताकींची भेट घेणार आहेत. १० नोव्हेंबर म्हणजेच आज (बुधवार) मुत्ताकी इस्लामाबादला पोहचणार असल्याचं सांगितलं जात आहे.

भारताने अफगाणिस्तानच्या मुद्यांवर अनेक देशांशी चर्चा केली आहे. या बैठकीमध्ये पाकिस्तान आणि चीनला सुद्धा बोलावण्यात आलं होतं. परंतु दोन्ही देशांनी बैठकीला येण्यासाठी नकार दिला होता. यावेळी तालिबान आंतरराष्ट्रीय मान्यतेची मागणी करत आहे. त्यामुळे ही बैठक महत्त्वपूर्ण होऊ शकते. पाकिस्तानने आतापर्यंत तालिबान सरकारला मान्यता दिलेली नाहीये. परंतु तालिबानचं शासन मान्यता देण्यासाठी सतत फ्रंटफूटवर खेळत आहे. रूस आणि अमेरिका यांसारखे देश तालिबानला मान्यता देण्यासाठी विचारविनिमय करत आहेत. तालिबान जोपर्यंत आपले वचन पूर्ण करत नाही, तोपर्यंत हे दोन्ही देश मान्यता देणार नाहीयेत.


हेही वाचा: आम्हाला कोणी कामगारांचे प्रश्न शिकवण्याचे गरज नाही, खासदार संजय राऊत यांचे वक्तव्य


 

या बैठकीबाबत पाकिस्तानच्या अधिकाऱ्याने सांगितलं की, ट्रोइका प्लस हे अफगाण अधिकार्‍यांशी संवाद साधण्याचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे. ते सर्वसमावेशक सरकारला पाठिंबा दर्शवतील. आम्ही अफगाणिस्तानातील मानवाधिकार, विशेषत: महिलांच्या हक्कांच्या संरक्षणावर चर्चा करू असं म्हटलं आहे.

First Published on: November 10, 2021 5:45 PM
Exit mobile version