राज्यमंत्री झाल्यानंतर संसदेत जाताना भारती पवार झाल्या नतमस्तक

राज्यमंत्री झाल्यानंतर संसदेत जाताना भारती पवार झाल्या नतमस्तक

राज्यमंत्री झाल्यानंतर संसदेत जाताना भारती पवार झाल्या नतमस्तक

राज्यमंत्री झाल्यानंतर पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जाताना खासदार डॉ. भारती पवार संसदेच्या पायथ्याशी नतमस्तक झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळाचा काही दिवसांपूर्वी विस्तार झाला. मोदींच्या मंत्रिमंडळात दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांना स्थान मिळालं. त्यांना केंद्रीय राज्य आरोग्यमंत्री करण्यात आलं आहे.

आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरु झालं आहे. दरम्यान, पहिल्यांदाच केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळालेल्या केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार या संसदेत दाखल झाल्या. यावेळी त्या संसदेच्या पायथ्याशी नतमस्तक झाल्या. डॉ. भारती पवार यांनी ट्विट केलं. यामध्ये त्यांनी “भारताचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर सुरू होत असलेल्या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी नतमस्तक होत कायम स्वरुपी जनतेच्या सेवेत समर्पित,” असं म्हटलं आहे.

कोण आहेत भारती पवार?

डॉ. भारती पवार या ए. टी. पवार यांच्या सून आहेत. पवार यांना आमदारकी व खासदारकीत दोन्ही वेळेस राष्ट्रवादीने त्यांच्या गृहकलहामुळे तिकीट दिले नव्हते. यामुळे त्यांनी २०१९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. डॉ. भारती पवार यांनी राष्ट्रवादीचे नेते पदाबरोबरच प्रदेश उपाध्यक्षपद भूषविलेले आहे. सुप्रिया सुळे यांच्या त्या निकटवर्तीय मानल्या जात. त्या राष्ट्रवादीकडून दोनदा जिल्हा परिषद सदस्यही राहिल्या आहेत. डॉक्टर असल्याने एक सुशिक्षित चेहरा म्हणून त्यांच्याकडे पहिले जाते. डॉ. पवार यांना दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीकडून उमेदवारी मिळाली होती तेव्हा त्यांना लाखांच्या घरात मतं मिळाली होती. २०१९ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीने शिवसेनेचा उमेदवार आयात केल्याने भारती पवार नाराज होत्या. ग्रामीण भागात भारती पवारांना मोठी सहानुभुती मिळाली, असं म्हटलं जातं. स्वत:ची यंत्रणा आणि आता सत्ताधारी भाजपची ताकद मिळाल्याने दिंडोरीत त्यांच्यासह पक्षाचीही ताकद वाढली आहे. त्या जोरावर २०१९ मध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या धनराज महालेंचा पराभव केला.

 

First Published on: July 19, 2021 3:16 PM
Exit mobile version