पतंजलीची विक्रीत सातत्याने घट; सावरण्यासाठी करणार ही युक्ती

पतंजलीची विक्रीत सातत्याने घट; सावरण्यासाठी करणार ही युक्ती

स्वदेशी उत्पादनांसाठी प्रसिद्ध असलेल्या पतंजली उत्पादनांच्या विक्रीत मागील दोन वर्षांपासून सातत्याने घट होताना दिसत आहे. सातत्याने घटणाऱ्या या विक्रीमुळे हैराण झालेल्या कंपनीने आता विक्री वाढविण्यासाठी एक विशेष निर्णय घेतला आहे. त्याअंतर्गत ग्राहकांवर आता सवलतींचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

विशेष सवलत आणि कॉम्बो पॅक्सच्या माध्यमातून कंपनी आपल्या उत्पादनांची विक्री वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. पतंजली आयुर्वेदचे प्रवक्ता अभिषेक राजपूत् यांनी वृत्तसंस्थेशी बोलताना याविषयी दुजोरा दिला आहे. मात्र त्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला. असे असले तरी पतंजलीने उचललेले हे सवलतींचे पाऊस आपल्या उत्पादनांचा खप वाढविण्यासाठीच आहे.

प्राप्त माहितीनुसार ‘तीन खरेदी करा आणि तीन मोफत मिळवा’, अशी योजना पतंजली आपल्या उत्पादनांसाठी आणणार आहे. याशिवाय ‘फूड कॅटेगरी’मधील काही खास उत्पादनांच्या खरेदीवर ५० टक्के सवलत दिली जाण्याची शक्यता आहे. ज्यूस, आंटा, तेल आणि रेडी टू इट खाद्यप्रकारांवर ही सवलत मिळणार आहे. तर पतंजली शॅम्पू, फेसवॉश सारखी उत्पादने कॉम्बो पॅकेजमध्ये विकली जाण्याची शक्यता आहे. अर्थात ही ऑफर निवडक शहरांतच उपलब्ध होणार आहे.

First Published on: July 3, 2019 12:27 PM
Exit mobile version