लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार

लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढणार

लॉकडाऊनचा ५ वा टप्पा देशातील लोकांच्या खिशाला परवडणारा नाही अशी शक्यता आहे. या काळात लॉकडाऊनमध्ये संभाव्य सूट मिळाली तरी तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढविण्याची दाट शक्यता आहे. तज्ञांच्या मते, ही वाढ प्रति लिटर ५ रुपयांपर्यंत होणार आहे. सरकारी तेल कंपन्यांची बैठक गेल्या आठवड्यात झाली होती. ज्यामध्ये दररोज पेट्रोल आणि डिझेल दरवाढीमध्ये सुधारणा करण्याबाबतही चर्चा झाली होती. देशात लॉकडाऊन सुरु झाल्यापासून तेल कंपन्यांकडून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. पेट्रोल आणि डिझेलच्या दरावरील व्हॅटमध्ये दिल्ली सरकारसह देशातील अनेक राज्यांनी वाढ केली आहे.

माहितीनुसार देशात लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात बरीच सवलत मिळण्याची शक्यता आहे. ज्यानंतर देशातील रहदारी मोठ्या प्रमाणात सुरू होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे पेट्रोल आणि डिझेलची मागणी वाढेल. हेच कारण आहे की तेल कंपन्या पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवू शकतात. तथापि, तेल कंपन्यांना आधी सरकारची परवानगी घ्यावी लागेल. यापूर्वी कठोर लॉकडाऊनमुळे आवश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या वाहनांच्या वाहतुकीवर बंदी होती. ज्यामुळे तेल कंपन्यांचं मोठं नुकसान झालं.

मागणीअभावी लॉकडाऊनमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या मागणीत मोठी घट झाली आहे. दुसरीकडे, कच्च्या तेलाची जागतिक मागणी घटल्यामुळे किंमतींमध्ये लक्षणीय घट झाली. याचा परिणाम म्हणून सरकारी तेल कंपन्यांना सुमारे ५० टक्के फायदा झाला आहे. सध्या कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ३० डॉलर आहे आणि त्यात स्थिर वाढ दिसून येत आहे. कच्च्या तेलाच्या किंमती कमी झाल्यामुळे उत्पादन शुल्कात वाढ झाल्याचा फटका सर्वसामान्यांना दिसत नव्हता.


हेही वाचा – छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचं निधन


तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार तेल कंपन्यांच्या पेट्रोल आणि डिझेलच्या खरेदी-विक्री किंमतीत सुमारे पाच रुपये प्रतिलिटर फरक आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाची किंमत कमी किंवा स्थिर राहिल्यास तेल कंपन्यांना दररोज प्रति लीटर ५० पैशांची अंतर वाढण्यास दोन आठवडे लागतील.

संपूर्ण जगात लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणली जात आहे. त्याचा परिणाम क्रूड तेलाच्या किंमतींमध्ये दिसून येत आहे. मागील महिन्याच्या मते, मे महिन्यात ब्रेंट क्रूडच्या किंमतीत ५९ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आगामी काळात क्रूड तेलाच्या किंमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. ज्यामुळे देशात पेट्रोल आणि डिझेलची किंमत वाढलेली दिसून येईल.

 

First Published on: May 29, 2020 6:58 PM
Exit mobile version