घरदेश-विदेशछत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचं निधन

छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचं निधन

Subscribe

वयाच्या ७४ व्या वर्षी अजित जोगी यांनी अखेरचा श्वास घेतला.

छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री अजित जोगी यांचं आज शुक्रवारी निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अजित जोगी यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ते २० दिवसांपासून रुग्णालयात होते. त्यांच्या निधनाची बातमी त्यांचे पुत्र अमित जोगी यांनी दिली. अजित जोगी यांचं अंत्यदर्शन उद्या त्यांच्या मूळगावी गोरेला येथे होणार आहे.

अजित जोगी यांच्यावर २१ दिवसांपासून रायपूरच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना शुक्रवारी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांची प्रकृती अधिक गंभीर बनली. शुक्रवारी राजधानी रायपूरमधील नारायण रुग्णालयात अजित जोगी यांनी अखेरचा श्वास घेतला. गेल्या २१ दिवसांपासून रायपूरमधील नारायणा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. तेव्हापासून जोगी कोमामध्ये होते. डॉ सुनील खेमका आणि डॉ. पंकज उमर यांच्या नेतृत्वात तज्ज्ञांची टीम सतत २४ तास त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून होती.

- Advertisement -

९ मे रोजी केलं होतं रुग्णालयात दाखल

हृदयविकाराचा झटका आल्यानंतर ९ मे रोजी जोगी यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. माजी मुख्यमंत्र्यांच्या कर्मचार्‍यांनी सांगितलं की ९ मे रोजी सकाळी न्याहारी करत असताना जोगी यांना अचानक छातीत दुखू लागलं आणि श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. ते आपली पत्नी रेणु जोगी यांच्यासमवेत होते आणि त्यांनी घरी कर्मचार्‍यांना याची माहिती दिली. त्यानंतर परिस्थिती गंभीर झाल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं. वडिलांच्या तब्येतीची माहिती मिळताच चिरंजीव अमित जोगीही बिलासपूरला पोहोचले.


हेही वाचा – आतापर्यंत ३८४० श्रमिक स्पेशल गाड्या धावल्या, ५२ लाख लोकांनी केला प्रवास – रेल्वे

- Advertisement -

अजित जोगी छत्तीसगडचे पहिले मुख्यमंत्री

छत्तीसगडच्या स्थापनेनंतर अजित जोगी राज्याच्या राजकारणाची धुरा बनले. छत्तीसगडचे राजकारण नेहमीच अजित जोगीभोवती फिरलं आहे. जेव्हा २००० मध्ये प्रथमच अजित जोगी यांनी छत्तीसगडच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली तेव्हा त्यांचे वक्तव्य इतिहासाच्या पानावर नोंदवलं गेलं. मुख्यमंत्री पदाव्यतिरिक्त दोनवेळा राज्यसभेचे सदस्य, लोकसभेचे दोनदा सदस्य होते.

जोगी बराच काळ कॉंग्रेसमध्ये राहिले

स्वतंत्र छत्तीसगड राज्य स्थापनेनंतर पहिले मुख्यमंत्री झालेले जोगींचे शेवटच्या काळात छत्तीसगड जनता कॉंग्रेस पक्षाशी संबंध होते. त्यांनी स्वत: हा पक्ष स्थापन केला. आयएएसची नोकरी सोडून राजकारणात रुजू झालेले जोगी हे राज्य विधानसभा, लोकसभा, राज्यसभा आणि केंद्रीय मंत्रिमंडळाचे सदस्य होते.

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -