दरवाढ काही थांबेना; पेट्रोलचे दर पुन्हा महागले

दरवाढ काही थांबेना; पेट्रोलचे दर पुन्हा महागले

पेट्रोलचे दर पुन्हा महागले

गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होती. मात्र, दर कपातीनंतर आता पुन्हा एकदा इंधन दरवाढीचा भडका उडाला आहे. राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली आहे. दिल्लीमध्ये पेट्रोल १५ पैशांने वाढले आहे. त्यामुळे आज दिल्लीत पेट्रोल ७४.३५ आणि डिजेल ६५.८४ रुपये मोजावे लागतील.

मुंबईतील पेट्रोल – डिझेल दर

मुंबईमध्ये पेट्रोल १५ पैशांने वाढले आहे. त्यामुळे आज मुंबईत पेट्रोलकरता ८० रुपये मोजावे लागणार आहेत. तर डिजेलच्या दरातही वाढ झाली आहे. त्यामुळे डिझेलकरता ६९ रुपये मोजावे लागणार आहेत.

गेल्या काही दिवसांपासून पेट्रोलच्या दरांमध्ये वाढ होत आहे. १९ नोव्हेंबर रोजी मुंबईत पेट्रोल १५ पैशांनी महागल होत. त्यामुळे मुंबईकरांना पेट्रोलसाठी ७९.८६ रुपये मोजावे लागले. मात्र, आता डिझेलच्या दरात वाढ झाली नाही. तर मुंबईत डिझेलचा दर ६९ रुपयांवर आला आहे.

आयआयटीच्या विद्यार्थ्यांच अनोख तंत्रज्ञान

पेट्रोल पंपावर मापात पाप करणाऱ्यांना आता चांगलाच चाप बसणार आहे. कारण आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी अनोख तंत्रज्ञान विकसित केले आहे. हे तंत्रज्ञान म्हणजे पंपावर गाडीत पेट्रोल भरल्यानंतर एक नोटिफिकेशन मोबाइलच्या माध्यमातून मिळणार असून, आपण गाडीत किती पेट्रोल भरले ते अचूकरित्या कळणार आहे. आयआयटी विद्यार्थ्यांनी प्राध्यापक नचिकेत तिवारी यांच्या मार्गदर्शनाखाली हे फ्लू क्वांटिफायर डिवाइस तयार केले आहे. त्यामुळे आता पेट्रोल पंपावर होणारी चोरी रोखण सहज शक्य होणार आहे.


हेही वाचा – मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड


 

First Published on: November 22, 2019 12:52 PM
Exit mobile version