घरमुंबईमुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड

मुंबईच्या महापौरपदी किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड

Subscribe

शिवसेना नगरसेविका किशोरी पेडणेकर यांची मुंबईच्या महापौरपदी बिनविरोध निवड झाली आहे. मावळते महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी पेडणेकरांच्या नावाची घोषणा करून त्यांना महापौरांच्या खुर्चीवर बसवलं.

मुंबई महापालिकेच्या महापौरपदासाठी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर यांची बिनविरोध निवड झाली आहे. महापौरपदासाठी भाजप तसेच विरोधी पक्षाच्यावतीने कुणीही उमेदवारी अर्ज न भरल्याने पिठासीन अधिकारी विश्वनाथ महाडेश्वर यांनी त्यांच्या नावाची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले. महापौरपदाच्या निवडणुकीला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीलाच पिठासीन अधिकारी विश्वनाथ महाडेश्वर यांनी महापोरपदासाठी एकही अर्ज न आल्याने किशोरी पेडणेकर यांची या पदासाठी निवड करण्यात येत असल्याचे जाहीर केले. त्यानंतर महापौरांनी त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांना शुभेच्छा देत महापौरपदी त्यांना विराजमान केले.

किशोरी पेडणेकर यांची राजकीय कारकिर्द

किशोरी पडणेकर या प्रथम २००२च्या सार्वत्रिक निवडणुकी लोअर परळमधून निवडून आल्या होत्या. त्यानंतर २००७मध्ये आरक्षणामुळे त्यांना संधी मिळाली नाही. परंतु २०१२ आणि २०१७च्या सार्वत्रिक निवडणुकीत सलग दोनदा त्या निवडून आल्या आहेत. तिसर्‍यांदा नगरसेवक झालेल्या किशोरी पेडणेकर यांनी दोन वेळा जी/दक्षिण प्रभाग समितीचे अध्यक्षपद, स्थापत्य शहर समितीचे अध्यक्ष तसेच महिला व बाल कल्याण समितीचे अध्यक्षपद भूषवले आहे. तर सुधार समिती, शिक्षण, स्थापत्य शहर आणि महिला व बाल कल्याण समिती सदस्यपद देखील त्यांनी भूषवले आहे.

महापौर पदी विराजमान झाल्यावर किशोरी पेडणेकर यांनाही पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी वहिनी यांनी टाकलेल्या विश्वासाबद्दल आभार मानले. भारताची औद्योगिक राजधानी आणि अवघ्या विश्वाचे आकर्षण असलेल्या या मुंबई शहराचे अनन्यसाधारण महत्व आहे. या शहराची शान आणि कीर्ती टिकवून ठेवण्याबरोबरच हे शहर सर्व सुखसोयींयुक्त आणि सुरक्षित ठेवण्याची जबाबदारी महापौर म्हणून माझीच आहे, असे मी समजते, असं महापौर यावेळी म्हणाल्या.

- Advertisement -

रुग्णालय परिचारिका म्हणून दिला होता राजीनामा…

महापालिका रुग्णलयामध्ये परिचारिका म्हणून सेवेत असणार्‍या पेडणेकर यांनी या सेवेचा राजीनामा देत २००२ मध्ये महापालिका निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्या विजयी झाल्या. परंतु, त्यानंतर २००७मध्ये त्यांना संधी मिळाली नसल्याने त्यांनी पक्षाच्या अनेक आंदोलनात सहभागी होत आपला आक्रमक बाणा दाखवून दिला होता. त्यामुळेच पक्षाने त्यांच्यावर महिला विभाग संघटकाची जबाबदारी सोपवली होती. तसेच, वरळी विधानसभेमध्ये आदित्य ठाकरे यांच्या निवडणुकीत विशेष मेहनत घेत त्यांनी उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांची मर्जी मिळवली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -