पेट्रोल-डिझेलचे दरवाढीचे सत्र सुरुच

पेट्रोल-डिझेलचे दरवाढीचे सत्र सुरुच

Petrol diesel Rate: सलग १८व्या दिवशी पेट्रोल डिझेलचे दर जैसे थे, जाणून घ्या आजचे दर

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ झाल्यानतर देशांतर्गत वाढ झाल्याने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत देखील वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी इंधन कंपनी ‘इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड’ने पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत पुन्हा एकादा पाचव्या दिवशी इंधनमध्ये वाढ झाली आहे.

जनता पुन्हा एकदा त्रस्त

इंधनाचे दर कमी करुन सरकारने जनतेला काहिसा दिलासा दिला होता. मात्र पेट्रोल- डिझेलच्या दरवाढीचे सत्र पुन्हा सुरु झाले आहे. त्यामुळे जनता पुन्हा एकदा त्रस्त झाली आहे. आधी दरवाढ कमी केल्याचे सरकारने जाहीर केले आणि आता पुन्हा दर वाढ सुरु झाल्यामुळे दरवाढ कमी करुन नेमका काय फायदा झाला असा सवाल जनता विचारत आहे.

दिल्लीचे पेट्रोल – डिझेलचे दर

राजधानी नवी दिल्लीत पेट्रोलच्या किंमतीत प्रतिलीटर पेट्रोल दर २८ पैशाने तर डिझेल २९ पैशाने वाढले आहे. आज दिल्लीमध्ये पेट्रोल ७०.७१ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ६४.४७ रुपये प्रतिलिटर झाले आहे.

मुंबईचे पेट्रोल – डिझेलचे दर

आज मुंबईत पेट्रोल दर देखील २८ पैशाने तर तर डिझेल २९ पैशाने वाढलेले पाहायला मिळत आहे. आज मुंबईमध्ये पेट्रोलसाठी ७०.४१ रुपये प्रतिलिटर तर डिझेल ६४.४७ रुपये प्रतिलिटर झाले आहे.

कोलकाता पेट्रोल – डिझेलचे दर

कोलकतामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अनुक्रमे ३७ आणि ४९ पैशाने वाढ झाली आहे.

चेन्नई पेट्रोल – डिझेलचे दर

चेन्नईमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत अनुक्रमे ४० आणि ५३ पैशाने वाढ झाल्याचे नोंदविण्यात आले आहे.

First Published on: January 15, 2019 8:43 AM
Exit mobile version