PM CARES: कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मोदी सरकार देणार मोफत शिक्षण आणि मासिक भत्ता

PM CARES: कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मोदी सरकार देणार मोफत शिक्षण आणि मासिक भत्ता

PM CARES: कोरोनामुळे अनाथ झालेल्या मुलांना मोदी सरकार देणार मोफत शिक्षण आणि मासिक भत्ता

देशात अजूनही कोरोनाचा कहर कायम आहे. आतापर्यंत ३ लाखांहून अधिक जणांनी कोरोनामुळे आपले प्राण गमावले आहे. तसेच कोरोनामुळे अनेक मुलं अनाथ झाली आहेत. याचं मुलांसाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. कोरोनाच्या काळात आई-वडिलांना गमावलेल्या मुलांना पीएम केअर फॉर चिल्ड्रेन (PM-CARES for Children) अंतर्गत मदत केली जाणार करणार आहे. तसेच सरकारकडून अनाथ मुलांना मोफत शिक्षण दिले जाणार आहे.

माहितीनुसार, कोरोनामुळे अनाथ झालेली मुलं १८ वर्षांची झाल्यावर मासिकत भत्ता दिला जाईल आणि २३ वर्षांचे झाल्यावर पीएम केअर्स फंडमधून १० लाख रुपये दिले जातील. त्यांच्यासाठी मोफत शिक्षणाची व्यवस्था केली जाईल. कोरोनामुळे आपल्या आई-वडिलांना गमावलेल्या मुलांना वयाच्या १८ वर्षांपर्यंत आयुष्मान भारत अंतर्गत ५ लाख रुपयांचा मोफत आरोग्य विमा दिला जाईल. शिवाय अशा मुलांना उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज मिळण्यासाठी मदत केली जाणार असून याचे व्याज पीएम केअर्स फंडद्वारे दिले जाईल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘भारताचे भविष्य मुलं असून आम्ही त्यांच्या संरक्षणासाठी आणि मदतीसाठी सर्व काही करू. त्यांची काळजी घेणे आणि एका उज्ज्वल भविष्याची आशा करणे हे आमचे कर्तव्य आहे.’

कोरोना दुसऱ्या लाटेमुळे भारतात बिकट परिस्थिती निर्माण झाली. दररोज लाखो प्रकरणांची नोंद होत आहे. आतापर्यंत ३ लाखांहून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. लहान मुलांना कोरोनाचा फटका बसला आहे. अनेक मुलांनी कोरोनामुळे आपले आई-वडील गमावले आहेत. अनाथ मुलांबाबत सर्वोच्च न्यायालयाने राज्यांना निर्देशही जारी केले होते. शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, ‘कोरोनामुळे अनाथ मुलांच्या गरजांची देखभाल राज्य सरकारने करावी.’


हेही वाचा – Corona Vaccination: कोरोना लसीच्या पुरवठ्याचे कॅग ऑडिट करा – पी. चिदंबरम


 

First Published on: May 29, 2021 7:03 PM
Exit mobile version