PM Fasal Bima Yojana: पंतप्रधान पिक विमा योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी ७५ जिल्ह्यांमध्ये राबवणार विशेष अभियान

PM Fasal Bima Yojana: पंतप्रधान पिक विमा योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी ७५ जिल्ह्यांमध्ये राबवणार विशेष अभियान

PM Fasal Bima Yojana: पंतप्रधान पिक विमा योजनेची व्याप्ती वाढवण्यासाठी ७५ जिल्ह्यांमध्ये राबवणार विशेष अभियान

केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र तोमर यांनी गुरुवारी पंतप्रधान पिक विमा योजनेच्या (PM Fasal Bima Yojana) सप्ताहाची घोषणा केली. पंतप्रधान पिक विमा योजनचे व्याप्ती वाढविण्यासाठी सरकार शेतकऱ्यांसाठी जनजागृती करणारी एक विशेष मोहिम राबवणार आहे. ही जनजागृती योजना देशातील महत्त्वाच्या ७५ जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार असून पिक विमा योजनेचा मोठ्या प्रमाणात विस्तार व्हावा हा यामागचा हेतू आहे.  (PM Fasal Bima Yojana: Special campaign to implemented in 75 districts to expand the scope of PM crop insurance scheme) तोमर यांनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना ७५ जिल्ह्यात ही योजना राबवून शेतकऱ्यांमध्ये याबाबत माहिती द्यावी अशा सूचना देण्यात आल्या आहेत. ही योजना २०१६मध्ये सुरु करण्यात आली असून आतापर्यंत ८.३ कोटी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे. शेतकऱ्यांच्या एकूण १७ हजार कोटी रुपयांच्या प्रीमियमच्या तुलनेत आतापर्यंत ९५ हजार कोटीहून अधिक पैसे शेतकऱ्यांना देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांमध्ये दिवसेंदिवस या योजनेसाठीची नोंदणी वाढत आहे. विविध आपत्तीमुळे देशात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते. त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत या योजनेची माहिती पोहचवणे महत्त्वाचे आहे. या योजनेतंर्गत वर्षभरात जवळपास ५.५ कोटींहून अधिक शेतकरी नोंदणी करत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या योजनेची सर्वाधिक माहिती देण्यासाठी सरकारने विशेष अभियान राबवण्याचा निर्णय घेतला आहे.

देशातील सर्व शेतकऱ्यांच्या शेतातील मातीचे हेल्थ कार्ड तयार झाल्याने खत कंपन्यांनाचे काम सोपे झाले आहे. शेत आणि मातीच्या संतुलनाच्या हिशोबाने खतांचा उपयोग वाढवण्याची तयारी सुरु करण्यात आली आहे. मातीची असंतुलितता कमी करण्यासाठी खतांचा आणि पोषक तत्वांचा शेतीसाठी वापरण्यात येईल. ज्यामुळे उत्पादन वाढण्यास मोठी मदत होऊ शकते. त्याचप्रमाणे भौगोलिक क्षेत्राचा अभ्यासकरुन पिकांच्या गरजेप्रमाणे खतांच्या आवश्यकतेवर जोर देण्याचे काम करण्यात आले आहे. कृषी अभ्यासकांच्या माहितीनुसार, नैसर्गिक संसाधने आणि वाढती लोकसंख्यानुसार खाद्य सुरक्षा ही मोठी समस्या उभी राहिली आहे. यापासून बचाव करण्यासाठी आधुनिक टेक्नोलॉजीचा वापर करणे हा एकमेव उपाय आहे.

चांगल्या जातीचे बियाणे आणि खतांसोबतच इतर सूक्ष्म पोषक तत्वांचा वापर वाढवणे आवश्यक आहे. पिकांच्या उत्पादनामध्ये खतांचा वापर २० टक्क्यांहून वाढला आहे तो कमी करणे महत्त्वाचे आहे.


हेही वाचा – LIC ने सुरू केली Saral Pension योजना; ६ महिन्यांनंतर घेता येणार कर्ज; जाणून घ्या सविस्तर

First Published on: July 2, 2021 12:04 PM
Exit mobile version