यंदाची G20 परिषद भारतात; पंतप्रधान मोदींनी लाँच केली वेबसाईट

यंदाची G20 परिषद भारतात; पंतप्रधान मोदींनी लाँच केली वेबसाईट

यंदाची जी 20 देशाची शिखर परिषद 2023 भारतात होणार आहे. या निमित्ताने 20 देशातील पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष यासह त्यांचे सचिव राजदूत आणि इतर खात्याचे विविध अधिकारी भारतात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी भारतात होणाऱ्या G20 परिषदेची वेबसाईट लाँच केली आहे. या वेबसाईट्सह लोगो आणि थीम देखील जाहीर केली आहे.

यावेळी नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘भारताच्या G20 परिषदेच्या ऐतिहासिक प्रसंगी मी देशवासियांचे अभिनंदन करतो. ‘वसुधैव कुटुंबकम’ हे जगाप्रती भारताच्या करुणेचे प्रतीक आहे. कमळ भारताचा सांस्कृतिक वारसा आणि जगाला एकत्र आणण्याचा विश्वास दर्शवते. जग विनाशकारी COVID-19 साथीच्या रोगानंतरच्या परिणामांमधून जात आहे. अशा परिस्थितीत, G20 लोगोचे चिन्ह आशेचे प्रतीक आहे. कितीही प्रतिकूल परिस्थिती आली तरी कमळ फुलतच राहते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, G20 लोगो हा केवळ लोगो नसून तो एक संदेश आणि भावना आहे जो आपल्या शिरपेचात आहे. हा एक ठराव आहे, जो आपल्या विचारात समाविष्ट करण्यात आला आहे, ‘कमळावरील सात पाकळ्या जगातील सात खंड आणि संगीताच्या सात स्वरांचे प्रतिनिधित्व करतात. G20 जगाला सामंजस्याने आणेल. या लोगोमधील कमळाचे फूल भारताचा पौराणिक वारसा, आपली श्रद्धा, आपली बुद्धी दर्शवत आहे.

1 डिसेंबरपासून भारत इंडोनेशियाकडून G20 चे अध्यक्षपद स्वीकारणार आहे, G20 परिशद किंवा 20 देशांचा समूह हा जगातील प्रमुख विकसित आणि विकसनशील अर्थव्यवस्थांचा आंतरशासकीय मंच आहे. यामध्ये अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, कोरिया प्रजासत्ताक, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, तुर्की, यूके, यूएस आणि युरोपियन युनियन (EU) यांचा समावेश आहे.

जी 20 परिषद ही आंतरराष्ट्रीय आर्थिक सहकार्याचा एक प्रमुख मंच आहे. जे जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनाच्या जवळपास (GDP) 85 टक्के, जागतिक व्यापाराच्या 75 टक्क्यांहून अधिक आणि जगाच्या लोकसंख्येच्या सुमारे दोन तृतीयांश भागाचे प्रतिनिधित्व करते. मंत्रालयाने म्हटले आहे की, G20 परिषदेच्या काळात भारत देशभरातील विविध ठिकाणी 32 विविध क्षेत्रांशी संबंधित सुमारे 200 बैठका आयोजित करेल. पुढील वर्षी होणारी G20 शिखर परिषद ही भारताकडून आयोजित करण्यात येणार्‍या उच्चस्तरीय आंतरराष्ट्रीय शिखर परिषदांपैकी एक असेल. भारत सध्या G20 ट्रोइका (वर्तमान, भूतकाळातील आणि आगामी G20 अध्यक्षपदाचा) भाग आहे ज्यात इंडोनेशिया, इटली आणि भारत यांचा समावेश आहे.


राहुल गांधींच्या ‘भारत जोडो यात्रे’ला नांदेडमधून सुरुवात; जाणून घ्या यात्रेतील घडामोडी


First Published on: November 8, 2022 8:02 PM
Exit mobile version