प्रामाणिक करदात्यांसाठी मोदी सरकारचं नवं व्यासपीठ

प्रामाणिक करदात्यांसाठी मोदी सरकारचं नवं व्यासपीठ

प्रामाणिक करदात्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि कर प्रणालीत पारदर्शकता वाढवण्यासाठी मोदी सरकारनं नवं व्यासपीठ सुरू केलं आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या नव्या व्यासपीठाचं लोकार्पण केलं. या व्यासपीठाचं ‘पारदर्शी कर आकारणी : प्रामाणिकतेचा सन्मान’ (Transparent Taxation : Honouring the Honest) असं नाव आहे. या व्यासपीठाच्या लोकार्पणावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, ‘हे व्यासपीठ २१ व्या शतकाच्या करप्रणालीची सुरुवात आहे. आजपासून ती लागू होणार आहे. देशाच्या निर्मितीत प्रामाणिक करदाता महत्त्वाची भूमिका पार पडतो. त्यामुळे देशाचाही विकास होत असतो. या नव्या व्यासपीठामुळे नियमित कर भरणाऱ्या करदात्यांची मनातील भीती दूर होईल.’

काय म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी?

मोदी म्हणाले की, ‘करदात्यांच्या प्रत्येक पैशाचा योग्य वापर करणे ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. करदाता जागरुक राहतील अशी अपेक्षा सरकारलाही आहे. ०.९४ टक्के छाननी २०१३-१३ मध्ये होत होती, हा आकडा २०१८-१९मध्ये ०.२६ टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच जवळपास ४ पटीने छाननी होण्याचं प्रमाण कमी झालं आहे. यावरून बदल किती व्यापक आहे हेच दर्शवत आहे.’

 

‘टॅक्स रिटर्न भरणाऱ्यांची संख्या गेल्या ६ ते ७ वर्षात अडीच कोटींनी वाढली आहे. परंतु ही वाढ १३० कोटींच्या लोकसंख्येच्या तुलनेत फार कमी झाली आहे. लोकसंख्यपैकी फक्त दीड कोटी लोक कर भरत आहे. यामुळे याबाबत सर्वांनी चिंतन करणं गरजेंच आहे. तसेच आपलं आत्मचिंतनच आत्मनिर्भर भारतासाठी गरजेचं आहे. पुढे येऊन कर भरला पाहिजे. याचा स्वातंत्र्य दिनानिमित्त विचार करा’, असं आवाहन मोदींनी यावेळी केलं आहे.


हेही वाचा – जगातील पहिल्या कोरोना लसीचे उत्पादन सुरू, दोन आठवड्यात पहिली बॅच तयार होणार


 

First Published on: August 13, 2020 11:54 AM
Exit mobile version