पाकिस्तानच्या परवानगीमुळेच पंतप्रधान मोदींची नॉनस्टॉप अमेरिका वारी

पाकिस्तानच्या परवानगीमुळेच पंतप्रधान मोदींची नॉनस्टॉप अमेरिका वारी

पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिका दौऱ्यावर असून, एअर इंडिया वन या त्यांच्या विमानाने दिल्ली ते वॉशिंग्टन डीसी असा प्रवासाचा मोठा टप्पा विनाथांबा पार केला. पाकिस्तानने आपल्या हवाई सीमेतून जाण्यास परवानगी दिल्यामुळेच हा प्रवास शक्य झाला.

अफगाणिस्थानची हवाई क्षेत्राला टाळून पंतप्रधानांचं विमान अमेरिकेच्या दिशेने गेलं. तालिबान्यांनी अफगाणिस्तानवर सत्ता मिळवली, तेव्हापासून भारताने अफगाणिस्थानच्या हवाई क्षेत्राचा वापर टाळला आहे. त्याऐवजी अन्य देशांच्या हवाई क्षेत्रांचा वापर केला जातोय.

पंतप्रधान मोदी पहिल्यांदा विनाथांबा हवाई प्रवास करत आहेत. भारतीय VVIP व्यक्तींच्या प्रवासासाठी खरेदी करण्यात आलेल्या विशेष सुविधांयुक्त विमानाने प्रथमच अमेरिकेकडे भरारी घेतली आहे. कोरोना संकटानंतर पंतप्रधान मोदी प्रथमच अमेरिका दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत एक शिष्टमंडळदेखील आहे. अमेरिकेतील नियोजित बैठकीत भारत आणि अमेरिका देशांतील विविध मुद्द्यांवर पंतप्रधान चर्चा करणार आहेत. बैठकीत पंतप्रधान मोदींसह जो बायडेनदेखील सहभागी होणार आहेत.

First Published on: September 22, 2021 5:24 PM
Exit mobile version