में देश नहीं मिटने दूंगा – नरेंद्र मोदी

में देश नहीं मिटने दूंगा – नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी (फाईल फोटो)

पाकिस्तान हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थान येथे सभेत लोकांना संबोधित केले. या सभेमध्ये त्यांनी शहिदांना नमन केले. या सभेला उपस्थित असलेल्या लोकांनी उत्साहाने नरेंद्र मोदींचे स्वागत केले. राजस्थान येथील चुरूयेथे या सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

काय म्हणले मोदी

“भारताच्या शुरांना नमन करतो. नागरिकांच्या जल्लोशाचे कारण मला माहिती आहे. २०१४ पासून मी ही घोषणा करतो आहे आजही करतो – में देश नहीं मिटने दूंगा. राजस्थानने देशाला अनेक जवान दिले आहे. येथील तरुण सीमाभागांवर देशाची सेवा करतात. म्हणून तुमची सेवा करणे माझ्यासाठी आवश्यक आहे. शहिदांच्या कुटुंबीयांना वन रॅक वन पेंशनमुळे फायदा झाला आहे. राजस्थानमधील १ लाखाहून अधिक जवानांच्या कुटुंबीयांना झाला आहे. जय जवान आणि जय किसान या भावनेला घेऊन आम्ही पुढे जात आहोत. मोदी सरकारच्या काळात अशक्य ही शक्य होते. आमची सरकार सबका साथ सबका विकास या आधारावर काम करते. सरकारने सुरु केलेल्या जीएसटीचे दर कमी करण्यात आले आहे.” – पंतप्रधान, नरेंद्र मोदी

First Published on: February 26, 2019 2:19 PM
Exit mobile version