Noida International Airport: नोयडा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे रोजगार संधी निर्माण होणार – पंतप्रधान मोदी

Noida International Airport: नोयडा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे रोजगार संधी निर्माण होणार – पंतप्रधान मोदी

Noida International Airport: नोयडा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे रोजगार संधी निर्माण होणार - पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गौतम बुद्ध नगरच्या जेवरमध्ये नोयडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. नोयडा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या उद्घाटनात पंतप्रधान मोदींनी प्रथम येथील एका प्रदर्शनाला भेट दिली. त्यानंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी पंतप्रधान मोदी यांचे स्वागत केले. यावेळी उपस्थितीत असलेल्या जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संबोधित केले. ‘आता जेवर आंतरराष्ट्रीय स्तरावर आले आहे आणि याचा लाभ उत्तर प्रदेशच्या जनतेसोबत दिल्ली एनसीआरला देखील होणार आहे. तसेच या आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे रोजगार संधी निर्माण होणार आहेत’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी पुढे म्हणाले की, ‘देशातील विमान वाहतूक क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. भारतीय कंपन्या शेकडो विमान खरेदी करत आहेत. त्यांच्यासाठी नोयडा आंतरराष्ट्रीय विमानतळाची मोठी भूमिका असेल. विमानांच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी हे विमानतळ मोठे केंद्र असेल. देश-विदेशातील विमानांना येथे सेवा दिली जाईल आणि तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल.’

‘आज आपण ८५ टक्के विमानं देखभालीसाठी परदेशात पाठवतो. दुरुस्तीसाठी १५ हजार रुपये कोटी खर्च होतात. हे आंतरराष्ट्रीय विमानतळ ही परिस्थिती बदलण्यास मदत करेल. या विमानतळाच्या माध्यमातून मल्टी मॉडेल कॉर्गोचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. तसेच या पूर्ण क्षेत्रातील विकासाला गती मिळेल,’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

नोयडा आंतरराष्ट्रीय विमानतळाचे वैशिष्ट्ये


हेही वाचा – भारतात चारपैकी एका मुलीचा बालविवाह, देशाच्या लोकसंख्येत घसरण – NFHS-5 सर्वेक्षण


First Published on: November 25, 2021 4:34 PM
Exit mobile version