…सांगा मी एकदा तरी हौस मौज केलीय का बरं?

…सांगा मी एकदा तरी हौस मौज केलीय का बरं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेच्या प्रचारासाठी आज अरुणाचल प्रदेशमध्ये सभा घेतली. त्यात त्यांनी मतदारांना भावनिक आवाहन केले. ते म्हणाले की आव्हानांनाही आव्हाने देतो, तुम्ही कधी ऐकलंय का? मी एक दिवस तरी मौज मस्ती केली म्हणून… देशाचा हा चौकीदार तुमच्या सेवकाप्रमाणे काम करत असतो. महाराष्ट्रातील वर्धा येथे झालेल्या सभेत त्यांनी ज्याप्रमाणे राष्ट्रवादी आणि कॉँग्रेसवर टिका केली, तोच रोख याही सभेत कायम होता.

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या प्रचाराचा नारळ फुटल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. देशभर ते रोज प्रचारसभा घेत आहेत. लाखो लोकांना संबोधित करत आहेत. आज त्यांनी सकाळी ईशान्येकडील अरुणाचल प्रदेशमधील पासिघाटला सभा घेतली. त्यांनी कॉँग्रेसवर पुन्हा एकदा टिका केली. गेली अनेक वर्षे या ठिकाणी कॉँग्रेसची सत्ता होती, मात्र तरीही या प्रदेशाचा विकास झाला नाही. मात्र भाजपा सत्तेवर आल्यानंतर मागील पाच वर्षांपासून अनेक विकासकामे झाली आहेत. आणखीही विकासकामे आम्ही करणार आहोत असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

इटानगर आणि दिल्ली असे विकासाचे डबल इंजिन तुम्ही लोकांनी लावले त्यामुळेच विकासाच्या नव्या मार्गावर अरुणाचल प्रदेशची वाटचाल सुरू आहे. जगातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना ठरलेली आयुष्यमान भारत योजना आमच्याच सरकारने लागू केल्याचेही नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितले.

First Published on: April 3, 2019 11:27 AM
Exit mobile version