SriLanka Crisis : श्रीलंकेत आणीबाणीदरम्यान मध्यरात्री संपूर्ण कॅबिनेट मंत्र्यांनी दिला राजीनामा, PM च्या मुलाचाही समावेश

SriLanka Crisis : श्रीलंकेत आणीबाणीदरम्यान मध्यरात्री संपूर्ण कॅबिनेट मंत्र्यांनी दिला राजीनामा, PM च्या मुलाचाही समावेश

SriLanka Crisis : श्रीलंकेत आणीबाणीदरम्यान मध्य रात्री संपूर्ण कॅबिनेट मंत्र्यांनी दिला राजीनामा, PM च्या मुलाचाही समावेश

श्रीलंका सर्वात मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. या आणीबाणीदरम्यान रविवारी मध्यरात्री श्रीलंका सरकारच्या संपूर्ण केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. यामध्ये पंतप्रधानांच्या मुलाचा देखील समावेश आहे. श्रीलंकेचे शिक्षण मंत्री आणि सभागृह नेते दिनेश गुणवर्धने यांनी सांगितले की, राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांना सोडून २६ मंत्र्यांनी राजीनामा दिला आहे. कॅबिनटने सामूहिक राजीनामा का दिला याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या श्रीलंकेला वाचवण्यासाठी सर्वपक्षीय कार्यवाहू सरकार स्थापन करण्याची मागणी जोर धरत आहे.

श्रीलंका देश आपल्या इतिहासातील सर्वात मोठ्या आर्थिक संकटाला समोरे जात आहे. मागील काही दिवसांपासून देशातील नागरिकांना इंधन आणि घरगुती गॅससाठी मोठ्या रांगांमध्ये उभे राहावे लागत आहे. तसेच अत्यावश्यक वस्तुंचाही तुटवडा निर्माण झाला आहे. राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी उशीरा एक एक अधिसूचना जारी करत श्रीलंकेत आणीबाणी लागू केली आहे. यानंतर शनिवारी संध्याकाळी ६ ते सोमवारी सकाळी ६ वाजेपर्यंत देशभरात संचारबंदी लागू केली होती.

पंतप्रधानांच्या मुलाचा पहिला राजीनामा

श्रीलंका सरकारच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने राजीनामा दिला आहे. यापूर्वी पहिला राजीनामा देशाचे क्रिडा मंत्री आणि पंतप्रधान राजपक्षे यांचा मुलगा नमल राजपक्षे याने सगळ्यात पहिला राजीनामा दिला आहे. यानंतर एका तासात अन्य मंत्र्यांनी राजीनामे दिले आहेत. त्रिमंडळाच्या राजीनाम्याचे पत्र आता पंतप्रधानांकडे आहे, जे राष्ट्रपती गोटबाया राजपक्षे यांच्याकडे सुपूर्द केले जाईल. येत्या काही दिवसांत नवीन मंत्रिमंडळ स्थापन होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

आंदोलनासाठी ६५० हून अधिक जणांना अटक

रविवारी राजधानी कोलंबोमध्ये सरकारच्या विरोधात निदर्शने केल्याप्रकरणी ६५० हून अधिक लोकांना अटक करण्यात आली होती. आर्थिक संकटाच्या निषेधार्थ कर्फ्यू मोडून हे लोक सरकारविरोधात मोर्चा काढत होते. श्रीलंकेत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही बंदी घालण्यात आली आहे. यानंतर रविवारी देशभरात फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सअॅप आणि इन्स्टाग्रामसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सेवा बंद झाली. इंटरनेट मॉनिटरिंग संस्था नेटब्लॉक्सने ही माहिती दिली.


हेही वाचा : Corona Cases In China : चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; एका दिवसात 9006 नवे रुग्ण

First Published on: April 4, 2022 9:17 AM
Exit mobile version