घरदेश-विदेशCorona Cases In China : चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; एका दिवसात 9006 नवे...

Corona Cases In China : चीनमध्ये कोरोनाचा हाहाकार; एका दिवसात 9006 नवे रुग्ण

Subscribe

भारतात गेल्या काही दिवसांपासून कोरोना महामारीचा प्रभाव कमी होत आहे. एकीकडे देशात कोरोना रुग्ण सातत्याने कमी होत आहेत, तर दुसरीकडे चीनमध्ये पुन्हा कोरोनाचा हाहाकार पाहयला मिळत आहे. चीनमध्ये सातत्याने कोरोना रुग्णसंख्या वाढतेय, त्यामुळे चीन नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनच्या 24 हून अधिक प्रातांमध्ये कोरोना संसर्ग पुन्हा झपाट्याने पसरत आहे.

एका अहवालानुसार, चीनच्या शांघाय प्रांतात गेल्या 24 तासात कोरोनाचे 9006 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या शिखरानंतरची ही एक दिवसीय वाढ आहे. चीनच्या शांघाय शहरात लॉकडाऊन असूनही एका दिवसात 9 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत आहे. यावरूनही कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येचे गांभीर्य लक्षात येते.

- Advertisement -

वाढत्या रुग्णांमुळे शहरातील आरोग्य व्यवस्था ढासळत चालली आहे. चीनचे आर्थिक शहर शांघायमधील रुग्णालयांमध्ये रुग्णांची संख्या इतकी वाढली आहे की, रुग्णांवर उपचार करण्यासाठी जागा उरलेली नाही. या सर्व परिस्थितीवर मात करण्यासाठी चीन सैन्य शांघायमध्ये 2,000 हून अधिक वैद्यकीय कर्मचारी पाठवत आहे जेणेकरून रूग्णांवर उपचार करता येतील.

शांघायमध्ये लॉकडाऊन

चीनमध्ये संसर्गाची सर्वाधिक वाढ शांघाय प्रांतात होत आहे. याठिकाणी दररोज कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. यामुळे संसर्ग रोखण्यासाठी शांघायमध्ये लॉकडाऊन लागू केला आहे. अशा परिस्थितीत लाखो लोक घराबाहेर पडत नाहीत. आरोग्य अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, गेल्या रविवारी येथे संसर्गाच्या 438 नवीन प्रकरणांची नोंद झाली होती. यासोबतच असे 7788 संक्रमित आढळले आहेत ज्यांना संसर्गाची लक्षणे नव्हती. अहवालानुसार, 2019 च्या अखेरीस वुहानमध्ये आढळलेल्या प्रकरणांनंतर शांघायमध्ये दररोज येणारी प्रकरणे चीनमध्ये सर्वाधिक आहेत. शांघायमधील 26 दशलक्ष लोकसंख्येला दोन टप्प्यांत लॉकडाऊनचा सामना करावा लागत आहे.

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -