पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे निधन, १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आईचे निधन, १०० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

अहदाबाद- पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या आई हीराबेन मोदी (Heeraben Modi) यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. मध्यरात्री ३.३० मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून यासंदर्भात माहिती दिली. त्यांच्या पश्चात पंतप्रधान नरेंद्र मोदी, सोमभाई, अमरुतभाई, प्रल्हादभाई, पंकजभाई ही मुलं आणि मुलगी वासंतीबेन यांच्यासह सुना, नातवंडे, पतरुंड असा मोठा परिवार आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आई हीराबेन मोदी यांची प्रकृती खालावली म्हणून २८ डिसेंबर रोजी अहमदाबाद येथील यू.एन मेहता रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारांनंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं होतं. मात्र, गुरुवारी रात्री अचानक त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. मात्र, उपचारांदरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. हीराबेन मोदी यांच्या निधनामुळे सामाजिक, राजकीय क्षेत्रातून शोक व्यक्त केला जात आहे.


आईच्या अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: गांधीनगर येथे येणार आहेत. मोदी अंत्यसंस्काराला येणार असल्याने गांधी नगरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

आईची तब्येत बिघडल्याचं कळताच मोदी गुजरातमध्ये दाखल झाले होते. तासभर आईच्या प्रकृती चौकशी त्यांनी केली. वृद्धापकाळ आणि आजारपणामुळे त्यांची प्रकृती बिघडली. मात्र, उपाचाराला साथ न मिळाल्याने त्यांचे निधन झाले.

यंदाच्या १८ जून रोजी हीराबेन मोदी यांनी वयाची १०० गाठली होती. त्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला होता. वाढदिवसासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः गांधीनगरला गेले होते. आईचे पाय धुवून त्यांनी आशीर्वादही घेतले होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आई हीराबेनबदद्ल विशेष स्नेह होता. हीराबेन गांधीनगरमध्ये मोदींच्या भावाबरोबर राहत होत्या.
मोदी वरचेवर आईला भेटण्यासाठी गुजरातला जात असत. त्यांच्या भेटीचे फोटोही सोशल मीडियावर बऱ्याचवेळा व्हायरल होत. गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी पंतप्रधान मोदी गुजरातला आले होते. त्यावेळीही त्यांनी आईची भेट घेत तिचे आशिर्वाद घेतले होते.

First Published on: December 30, 2022 6:43 AM
Exit mobile version