डान्स शोला बोलावून ब्लॅकमेल करणाऱ्या अभिनेत्रीला अटक

डान्स शोला बोलावून ब्लॅकमेल करणाऱ्या अभिनेत्रीला अटक

डान्स शोला बोलावून ब्लॅकमेल करणाऱ्या अभिनेत्रीला अटक

डान्स शो बघायला बोलावून येणाऱ्या प्रेक्षकांना प्रेमाच्या जाळ्यात ओढून ब्लॅकमेल करणाऱ्या एका अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे. ही गुजराती अभिनेत्री असून संजना उर्फ संजू असे या महिलेचे नाव आहे. या अभिनेत्रीचा मित्र सैय्यद मोईन अली हा तिला मदत करत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी गुजराती अभिनेत्री संजनाच्या विरोधात अनेकांनी तक्रारी दाखल केल्या असून संजना आणि तिचा मित्र सैय्यद मोईन अली याला अटक करण्यात आली आहे.

या ठिकाणची आहे ही अभिनेत्री

गुजरातमधील अहमदाबाद येथे जान्स शो बघायला बोलवणाऱ्या गुजराती अभिनेत्रीला ताब्यात घेण्यात आले आहे. संजना ही अभिनेत्री गुजरातमध्ये प्रसिद्ध असून ‘जानू मारी दगाबाज आणि वन्स मोर बेवफा’ या अल्बममध्ये तिने काम केले आहे. या अल्बममुळे तिची लोकप्रियताही वाढली होती. मात्र त्यानंतर तिला काम मिळेनासे झाले. तसेच तिचा पतीही बेरोजगार होता. त्यामुळे आपल्या लोकप्रियतेचा फायदा घेण्याचे तिने ठरवले. तिने आपल्या लोकप्रियतेचा गैरवापर करुन लोकांकडून पैसे उकळण्यास सुरुवात केली. यासाठी तिने सैय्यदबरोबर डान्स शो करण्यास सुरुवात केली. संजनाला प्रत्यक्षात पाहायला मिळणार असल्याने तिचे चाहते जान्स शोमध्ये मोठ्या संख्येने येत होते. याचाच गैरफायदा घेत संजना त्यांच्याबरोबर अंगलट करायची आणि याचे फोटो तिचा मित्र सैय्यद काढायचा. नंतर तेच फोटो दाखवून संजना आणि सैय्यद समोरच्या व्यक्तीला ब्लॅकमेल करायला लागले. त्यानंतर तिच्या अनेक चाहत्यांनी तिच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केली होती. या घटनेची माहिती मिळताच संजना गायब झाली. पण अखेर पोलिसांनी तिला शोधून काढले आणि तिला अटक केली आहे.


वाचा – ब्लॅकमेल करून अल्पवयीन मुलीवर बलात्कार


 

First Published on: November 29, 2018 7:07 PM
Exit mobile version