लॉकडाऊनमध्ये पीपीएफ खात्यातून पैसे काढता आले नाहीत, काळजी करू नका; जाणून घ्या नियम

लॉकडाऊनमध्ये पीपीएफ खात्यातून पैसे काढता आले नाहीत, काळजी करू नका; जाणून घ्या नियम

नोकरदारांना अच्छे दीन, तीन दिवस सुट्टी चार दिवस काम, केंद्र सरकार लागू करणार नवीन वेतन नियम

पीपीएफ खात्याची मॅच्युरिटी लॉकडाऊन दरम्यान पुर्ण झाली आहे आणि रक्कम काढता आली नाही का? सर्व लोकांच्या मनात असा प्रश्न निर्माण झाला आहे की, लॉकडाऊननंतर ही रक्कम परत घेईपर्यंत त्यांना पीपीएफ खात्यात जमा झालेल्या रकमेवर व्याज मिळणार आहे की नाही? जर आपणासही ही चिंता असेल तर आपल्याला अजिबात काळजी करण्याची आवश्यकता नाही. अर्थ मंत्रालयाच्या आदेशानुसार ज्या ग्राहकांच्या पीपीएफ खात्यात मुदतपूर्तीची वेळ ३१ मार्चपर्यंत होती, ती आता ३० जूनपर्यंत वाढविण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर या तीन महिन्यांच्या कालावधीत खात्यात असलेल्या ठेवींवरही व्याज मिळेल.

अर्थ मंत्रालयाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, ज्या ग्राहकांचे पीपीएफ खाते ३१ मार्च २०२० रोजी पूर्ण होतं त्यांचा कालावधी ३० जून २०२० पर्यंत वाढविण्यात येईल. ज्या खात्यावर ग्राहकांनी आधीच एक वर्षाची मुदतवाढ घेतली होती अशा खात्यांनाही ही सुविधा लागू असेल. यासाठी पीपीएफ खात्याच्या मॅच्युरिटी कालावधीत वाढ होण्यासाठी ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत मेलमधून टपाल खात्यास पत्र पाठवावे लागेल. लॉकडाऊन संपल्यानंतर आपण पत्राची मूळ प्रत सादर करू शकता. या वेळी, आपल्याला पूर्वीप्रमाणे खात्यावर व्याज मिळणे सुरू राहील.


हेही वाचा – चीनमध्ये आढळले कोरोनाचे नवे रुग्ण; शूलन शहरात मार्शल लॉ लागू


कोणत्याही पीपीएफ खात्याचा मॅच्युरिटी कालावधी १५ वर्ष असतो. जर ग्राहकांना कालावधी वाढवून हवा असेल तर बँकांकडून हा कालावधी १५ वर्षानंतर १ ते ५ वर्षांपर्यंत वाढविला जाऊ शकतो. कोरोना संकटामुळे झालेल्या आर्थिक मंदीमुळे सरकारने सुकन्या समृद्धि योजनेपासून पीपीएफ खात्यापर्यंतच्या सर्व बचत योजनांवरील व्याजदेखील कमी केले आहे. सध्या पीपीएफ खात्यांना ७.१ टक्के व्याज मिळत आहे.

 

First Published on: May 11, 2020 4:12 PM
Exit mobile version