घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटचीनमध्ये आढळले कोरोनाचे नवे रुग्ण; शूलन शहरात मार्शल लॉ लागू

चीनमध्ये आढळले कोरोनाचे नवे रुग्ण; शूलन शहरात मार्शल लॉ लागू

Subscribe

११ कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे समोर आल्यानंतर चीनच्या शूलन शहरात मार्शल लॉ लागू करण्यात आला आहे.

चीनने उत्तर कोरियाला लागून असलेल्या एका शहरात कोरोना विषाणूचे ११ रुग्ण आढळून आल्यानंतर रविवारी मार्शल लॉ लागू केला. शहरात प्राणघातक विषाणूचा प्रसार होण्याची भीती निर्माण झाली आहे. लॉन्ड्रीवूमनच्या संपर्कात आल्यानंतर या लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे ग्लोबल टाईम्सने वृत्त दिलं आहे.

सत्तारूढ कम्युनिस्ट पार्टी ऑफ चीन जिलिन प्रांतीय समिती सचिव बैन चोलू म्हणाले की, शूलन शहराने खबरदारी म्हणून मार्शल लॉ लागू करावा. बैन म्हणाले की शूलनमधील क्लस्टर इन्फेक्शनमुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. शूलनमध्ये शनिवारपासून स्थानिक समुदाय आणि खेड्यांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे.

- Advertisement -

चीनमध्ये कोरोनाचे ८२ हजार रुग्ण

रविवारी चीनमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाची 14 नवीन प्रकरणे समोर आली आहेत, त्यापैकी एक कोविड-१९ चं हॉटस्पॉट असलेल्या हुबेई या राज्यातील आहे. त्यानंतर, देशात कोरोनाबाधितांची संख्या वाढून ८२,९०१ झाली आहे, त्यापैकी ४,६३० लोकांचा मृत्यू झाला आहे. चीनच्या नॅशनल हेल्थ कमिशनने (एनएचसी) रविवारी बातमी दिली की देशात नवीन १२ जणांना संसर्ग झाला आहे, त्यातील एक व्यक्ती हुबेई प्रांतात संक्रमित आढळली आहे.


हेही वाचा – अनियोजित लॉकडाऊनचा फटका मजुरांना

- Advertisement -

मागील ३५ दिवसांपासून हुबेईमध्ये संक्रमितांची नोंद झालेली नाही. या संसर्गाचा प्रादुर्भाव प्रथम या प्रांतात होऊ लागला. शनिवारी एनएचसीने संक्रमणाची १४ नवीन प्रकरणे नोंदवली. या व्यतिरिक्त २० लोकांनाही संसर्ग झाल्याचं आढळलं आहे, ज्यांमध्ये लक्षणं दिसली नाहीत. अशा प्रकारच्या संक्रमित लोकांची संख्या ७९४ वर पोहचली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -