Government Scheme: खुशखबर! देशातील महिलांना केंद्र सरकारकडून मिळणार ६ हजार रुपये, काय आहे योजना? जाणून घ्या

Government Scheme: खुशखबर! देशातील महिलांना केंद्र सरकारकडून मिळणार ६ हजार रुपये, काय आहे योजना? जाणून घ्या

Government Scheme: खुशखबर! देशातील महिलांना केंद्र सरकारकडून मिळणार ६ हजार रुपये, काय आहे योजना? जाणून घ्या

केंद्र सरकार देशातील नागरिकांसाठी नेहमीच महत्त्वाच्या योजना ( Government Scheme)  आणत आहे. देशातील नागरिकांना या योजनांचा जास्तीत जास्त लाभ कसा घेता येईल याकडे त्यांचे लक्ष असते. त्यातच आता केंद्र सरकारने देशातील महिलांसाठी खास योजना आणली आहे. महिलांना आर्थिक मदत करणे हा या योजनेतील महत्त्वाचा हेतू आहे. केंद्र सरकारने महिलांचा विचार करुन ‘पंतप्रधान मातृत्व वंदना योजना’ (Pradhan Mantri Matru Vandana Yojana)  आणली आहे. या योजनेतंर्गत केंद्र सरकारकडून महिलांना ६ हजार रुपये मिळणार आहे. कशी आहे ही योजना आणि कशा प्रकारे या योजनेचा लाभ घेता येऊ शकतो जाणून घ्या.

केंद्र सरकारने देशातील महिलांना डोळ्यासमोर ठेवून पंतप्रधान मातृत्व वंदना योजना आणली आहे. १ जानेवारी २०१७मध्ये या योजनेचा प्रारंभ झाला. या योजनेतंर्गत आधी पहिल्यांदा गर्भधारणा झालेल्या आणि स्तनपान करणाऱ्या महिलांना आर्थिक मदत देण्यात येत होती. पंतप्रधान गर्भावस्था मदत योजना या नावाने ही योजना आधी ओळखण्यात येत होती. म्हणजेच गर्भवती महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्र

पंतप्रधान मातृत्व वंदना योजनेचा लाभ घेण्यासाठी आई वडिलांचे आधार कार्ड, आई वडिलांचे ओळखपत्र, मुलाचा जन्मदाखला आणि बँक खात्याचे पास बुक या कागदपत्रांची आवश्यकता आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी केंद्र सरकारच्या https://wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana या अधिकृत वेबसाइटवर विझीट करा.

तीन टप्प्यात मिळणार पैसे

आई आणि मुलांची चांगल्या प्रकारे देखभाल करणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. केंद्र सरकारकडून या महिलांना सहा हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात येणार आहे. महिलांना हे पैसे तीन टप्प्यांमध्ये मिळणार आहे. पहिल्या टप्प्यात १ हजार रुपये, दुसऱ्या टप्प्यात २ हजार रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात २ हजार रुपये देण्यात येतील आणि बाळाचा जन्म झाल्यावर शेवटच्या टप्प्यातील १ हजार रुपये सरकारकडून देण्यात येतील.


हेही वाचा – e-Shram Registration: ई- श्रम कार्ड बनवताना कसा अपलोड कराल फोटो? जाणून घ्या प्रोसेस

First Published on: January 4, 2022 6:22 PM
Exit mobile version