Virat : राष्ट्रपतींचा अंगरक्षक ‘विराट’ सेवानिवृत्त; राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी प्रेमाने गोंजारून दिला निरोप

Virat : राष्ट्रपतींचा अंगरक्षक ‘विराट’ सेवानिवृत्त; राष्ट्रपती आणि पंतप्रधानांनी प्रेमाने गोंजारून दिला निरोप

राष्ट्रपतींचा अंगरक्षक 'विराट' सेवानिवृत्त; राष्ट्रपती आणि पंतप्रधान मोदींने प्रेम गोंजारून दिला निरोप

राष्ट्रपतींच्या सुरक्षा ताफ्यात सलग 19 वर्षे सेवा देणारा घोडा ‘विराट’ अखेर सेवानिवृत्त झाला आहे .73 व्या प्रजासत्ताक दिनाच्या परेडनंतर विराट सेवेतून निवृत्त झाला आहे. राजपथावर प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमानंतर राष्ट्रपतींचे अंगरक्षक राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना पुन्हा राष्ट्रपती भवनावर घेऊन आले. यानंतर विराटच्या निवृत्तीची घोषणा झाली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी विराटला प्रेमाने गोंजारून निरोप दिला.

विराटला त्याच्या गुणवत्ता आणि उत्तम सेवेसाठी चीफ ऑफ आर्मी स्टाफ कमांडमेंट कार्ड देऊन गौरवण्यात आले आहे. अशाप्रकारचे मेडल मिळवणारा विराट हा पहिलाच घोडा आहे. विराटने पीबीजीमध्ये एकूण 19 वर्षे काम केले. तर गेली 13 वर्षे राष्ट्रपतींना सन्मानाने समारंभात घेऊन जाण्याचा मान विराटला मिळाला आहे. यंदा विराटने राष्ट्रपतींना आपला अंतिम एस्कॉर्ट सादर केला. राष्ट्रपतींचे अंगरक्षक चार्जर म्हणून देखील त्याला ओळखले जायचे.

राष्ट्रपती, पंतप्रधानांनी प्रेमाने गोंजारत दिली निरोप

राष्ट्रपतींच्या सुरक्षा ताफ्यातील एक महत्वाची भूमिका विराट निभावत होता. त्यामुळे भारतीय लष्कराने त्याचा विशेष सन्मान केला. विराटच्या सेवानिवृत्तीचा तो क्षण सर्वांसाठी एक भावनिक क्षण होता. यावेळी पंतप्रधान मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद, संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि गृहमंत्री अमित शहा यांनी विराटला प्रेमाने गोंजारून, पाठ थोपटून निरोप दिला. याचे फोटो सध्या सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहेत. राष्ट्रपतींच्या सुरक्षा ताफ्यातील तो एक सामान्य घोडा नसून राष्ट्रपतींच्या सुरक्षा आणि अंगरक्षक म्हणून तो महत्वाचा सदस्य होता.


 

First Published on: January 27, 2022 2:26 PM
Exit mobile version