द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा, कोण होणार भारताचे नवे राष्ट्रपती? आज निकाल होईल जाहीर

द्रौपदी मुर्मू की यशवंत सिन्हा, कोण होणार भारताचे नवे राष्ट्रपती? आज निकाल होईल जाहीर

भारताचा पुढील राष्ट्रपती कोण होईल यासंदर्भात निकाल 21 जुलै म्हणजे आज अधिकृत निकाल जाहीर होईल. त्यानुसार भारताला नवे राष्ट्रपती मिळणार आहे. 8 जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी आज पूर्ण होणार असून सायंकाळपर्यंत निकाल जाहीर होण्याचा अंदाज आहे. दरम्यान मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असून लवकरच भारताचे नव्या राष्ट्रपती पदाच्या विजयी उमेदवाराचा नाव जाहीर होईल. त्यानंतर 25 जुलै रोजी नव्या राष्ट्रपतींचा शपथविधी सोहळा पार पडेल.

दिल्लीच्या संसद भवानात मतमोजणी होणार असल्याने सर्व तयारी झाली आहे. खोली क्रमांक 63 मध्ये म्हणजे ठिकाणी मतदान पार पडले त्याच खोलीत ही मतमोजणी होईल. मतमोजणीसाठी सर्व राज्यांच्या विधानसभांच्या मतपेट्या दाखल झाल्या आहेत. दरम्यान 18 जुलै रोजी भारताच्या 16 व्या राष्ट्रपती पदासाठी निवडणुक पार पडली. यात 4800 खासदार आणि आमदारांनी मिळून मतदान केले, यात द्रौपदी मुर्मू यांना 27 हून अधिक पक्षांनी पाठींबा दिला. तर यशवंत सिन्हा यांना 14 पक्षांचा पाठींबा होता. या निवडणुकीत द्रौपदी मुर्मू विजयी झाल्यास देशात पहिल्यांदाच सर्वोच्च घटनात्मक पदावर एका आदिवासी महिला विराजमान होईल, दरम्यान एकून राजकीय जाणकारांच्या मते, या निवडणुकीत मुर्मू यांना सर्वाधिक पाठींबा मिळाल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.

राष्ट्रपती निवडणुकीत संसदेत ९९.१८ टक्के मतदान, २१ जुलैला लागणार निकाल

भाजप खासदार राजकुमार चहर यांच्या मते, अनुकूल आकडेवारी पाहता एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय निश्चित आहे. दरम्यान विविध राज्यांत क्रॉस व्होटिंगच्या घटना समोर आल्याने या निवडणुकीत विरोधी उमेदवार यशवंत सिन्हा यांची विजय होणं अवघड वाटत आहे. मुर्मूंच्या निवडणूक प्रचारावर लक्ष ठेवणाऱ्या भाजप सुत्रांच्या मते, मुर्मूंना किमान 65 टक्के मत मिळतील, त्यामुळे त्यांचा विजय निश्चित आहे.


राष्ट्रवादीचे राष्ट्रीय स्तरावरील सगळे विभाग आणि सेल तडकाफडकी बरखास्त, पवारांचा मोठा निर्णय

First Published on: July 21, 2022 8:08 AM
Exit mobile version