आज मोदींच्या हस्ते ‘आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियाना’चे उद्घाटन होणार

आज मोदींच्या हस्ते ‘आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियाना’चे उद्घाटन होणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘आत्मनिर्भर उत्तर प्रदेश रोजगार अभियान’चे उद्घाटन करणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाली ११ वाजता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून या अभियानाची सुरुवात करणार आहेत. या उद्घाटन कार्यक्रमाला राज्य सरकारच्या संबंधित विभागाचे मंत्री देखील उपस्थित राहणार आहेत. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील सहा जिल्ह्यातील ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत. या अभियानांतर्गत एक कोटींपेक्षा जास्त स्थानिक आणि स्थलांतरित मुजरांना रोजगार उपलब्ध होणार आहेत.

दरम्यान उत्तर प्रदेशमध्ये ३० लाख स्थलांतरित मजूर परतले आहेत. राज्यातील ३१ जिल्ह्यात परत आलेल्या स्थलांतरित मजुरांची संख्या २५ हजारांहून अधिक आहे. या अभियानाचे मुख्य उद्देश रोजगार उपलब्ध करून देणे आहे. शिवाय स्थानिक पातळीवर उद्योजकता वाढविणे आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करणे आहे.

कोरोना आणि लॉकडाऊन दरम्यान अनेक स्थलांतरित मजूर आपल्या राज्यात परतले आहेत. यामुळे स्थलांतरित मजुरांना आणि ग्रामीण मुजरांना मूलभूत गरजा आणि रोजगाराची साधने उपलब्ध करून देण्याचे आव्हान निर्माण झाले आहे. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारने ‘आत्मनिर्भर भारत पॅकेज’ जाहीर केले आहे. देशातील मागासलेल्या भागात मजबूत पायाभूत सुविधा निर्माण करून रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने २० जून रोजी ‘गरीब कल्याण रोजगार अभियान’ सुरू करण्यात आले.


हेही वाचा – यूपीएच्या कार्यकाळात PMNRF चा निधी राजीव गांधी फाउंडेशनला दिला; भाजपचा आरोप


 

First Published on: June 26, 2020 11:03 AM
Exit mobile version