Jan Samarth Portal launch: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘जन समर्थ’ पोर्टल लाँच करणार, कॉमन प्लॅटफॉर्मवर मिळणार अनेक सुविधा

Jan Samarth Portal launch: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘जन समर्थ’ पोर्टल लाँच करणार, कॉमन प्लॅटफॉर्मवर मिळणार अनेक सुविधा

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ६ जून रोजी जन समर्थ पोर्टल लाँच करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व प्रकारच्या कर्जावर आधारित सरकारी योजना जन समर्थ पोर्टलशी जोडल्या जाणार आहेत. या एकाच कॉमन प्लॅटफॉर्मवर बँक लोन सारख्या अनेक सुविधा लाभार्थींना मिळणार आहेत. लाभार्थी आणि कर्जदारांना थेट जोडणारे हे भारतातील पहिले प्लॅटफॉर्म असणार आहे. हे पोर्टल विविध क्षेत्रांच्या सर्वसमावेशक वाढ आणि प्रगतीला चालना देईल.

पीएम मोदी जारी करणार विशेष नाणी

पोर्टल लॉन्च व्यतिरिक्त, पीएम मोदी एक डिजिटल प्रदर्शन देखील लॉन्च करणार आहेत. ज्यामध्ये दोन्ही मंत्रालयांचा गेल्या आठ वर्षातील प्रवास सांगितला जाणार आहे. याशिवाय पंतप्रधान एक रुपया, दोन रुपये, पाच रुपये, दहा रुपये आणि वीस रुपयांची विशेष नाणी जारी करणार आहेत. या नाण्यांवर स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा लोगो असेल.

हळूहळू केला जाणार पोर्टलचा विस्तार

खरं तर सर्वसामान्यांचे जीवन सुसह्य व्हावे, यासाठी सरकारने विविध मंत्रालयं आणि विभागांमार्फत राबविल्या जाणाऱ्या अनेक योजनांच्या वितरणासाठी ‘जन समर्थ’ हे कॉमन पोर्टल सुरू करण्याची योजना आखली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी सरकार किमान सरकार, जास्तीत जास्त प्रशासन’ या संकल्पनेसह एक नवीन पोर्टल सुरू करण्याचा विचार करत आहे, ज्यामध्ये १५ क्रेडिट-लिंक सरकारी योजनांचा समावेश आहे. केंद्राच्या काही योजनांमध्ये अनेक एजन्सींचा सहभाग असतो, त्यामुळे हळूहळू त्याचा विस्तार केला जाणार आहे.

प्लॅटफॉर्मवर मिळणार या सुविधा

प्रधानमंत्री आवास योजना आणि क्रेडिट लिंक कॅपिटल सबसिडी स्कीम (CLCSS) यांसारख्या योजना विविध मंत्रालयांद्वारे चालवल्या जात आहेत. प्रस्तावित पोर्टल या योजना एकाच व्यासपीठावर आणण्याची योजना आखत आहे, जेणेकरून लाभार्थी कोणत्याही अडचणीशिवाय त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतील. आतापर्यंत त्याची प्रायोगिक चाचणी घेतली जात होती, जी आता ६ जून रोजी पंतप्रधानांच्या हस्ते लॉन्च होणार आहे. या पोर्टलमध्ये ओपन आर्किटेक्चर असेल, ज्यामुळे भविष्यात राज्य सरकार आणि इतर संस्था देखील त्यांच्या योजनांचा समावेश या व्यासपीठावर करू शकतील.


हेही वाचा : Jan Samarth Portal launch: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज ‘जन समर्थ’ लाँच करणार, कॉमन प्लॅटफॉर्मवर मिळणार बँक लोन सारख्या सुविधा, जाणून घ्या


 

First Published on: June 6, 2022 10:01 AM
Exit mobile version