Missile Test: अमेरिका आणि दक्षिण कोरियाकडून उत्तर कोरियाला करारा जवाब, एकाच वेळी केली ८ क्षेपणास्त्रांची चाचणी

उत्तर कोरियाच्या (North Korea) क्षेपणास्त्र प्रक्षेपणाला प्रत्युत्तर म्हणून दक्षिण कोरिया (South Korea) आणि अमेरिकेने (America) एकाच वेळी ८ क्षेपणास्त्रांची चाचणी केली. या क्षेपणास्त्रांची चाचणी (Missile Test) विविध प्रकारच्या लक्ष्यांवर करण्यात आल्याची माहिती दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफने (JCS) दिली आहे. जेसीएसच्या विधानानुसार, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने संयुक्तपणे एका पृष्ठभागावरून दुसऱ्या पृष्ठभागावर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. यामुळे कोणत्याही आव्हानाच्या वेळी तात्काळ आणि अचूक आक्रमण करण्याची क्षमता आमच्या संरक्षणाकडे आहे याची खात्री झाली आहे.

दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने सांगितलं की,, आमच्या सैन्याने (दक्षिण कोरिया आणि अमेरिका) बॅलेस्टिक क्षेपणास्त्र चाचण्यांद्वारे उत्तर कोरियाच्या प्रक्षोभक कृतींचा तीव्र निषेध केला आहे आणि तसे करण्यास गांभीर्याने आवाहन केले आहे.

हेही वाचा : Kim Jong Un: उत्तर कोरियावर उपासमारीची वेळ, हुकूमशहा किम जोंग उनने कमी केले २० किलो वजन, पहा फोटो

किम जोंग उनची १० वर्षांमध्ये १०० हून अधिक क्षेपणास्त्रांची चाचणी

उत्तर कोरियाने आंतरमहाद्वीपीय क्षेपणास्त्र (ICBM) सह ८ बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी केल्यानंतर, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेने देखील संयुक्तपणे ८ क्षेपणास्त्रांची चाचणी घेतली. २०१७ नंतर दोन्ही देशांमधील ही पहिलीच संयुक्त कारवाई होती.

याआधी उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन म्हणाले होते की, त्यांचा देश आपली आण्विक क्षमता वाढवत राहील. किम जोंग उन यांनी पदभार स्वीकारल्यापासून गेल्या १० वर्षात उत्तर कोरियाने १०० हून अधिक क्षेपणास्त्रांच्या चाचण्या केल्या आहेत. ज्यामध्ये आंतरमहाद्वीपीय क्षेपणास्त्रे (ICBM) आणि ४ अणुचाचण्यांचा समावेश आहे. किम जोंग उनचे वडील किम जोंग इल यांनी त्यांच्या १० वर्षांच्या कार्यकाळात १६ क्षेपणास्त्रं प्रक्षेपण आणि २ अणुचाचण्या करण्यात आल्या होत्या.

उत्तर कोरियाच्या क्षेपणास्त्र चाचणीचा क्वाडच्या नेत्यांकडून निषेध

मागील महिन्यातील टोक्योत क्वाड शिखर सम्मेलनाच्या दरम्यान नेत्यांनी उत्तर कोरियाच्या बॅलिस्टिक मिसाईल प्रक्षेपणाची निंदा केली होती. आम्ही उत्तर कोरियाच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र विकासाचा आणि प्रक्षेपणाचा निषेध करतो आणि संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या ठरावांची पूर्ण अंमलबजावणी करण्याचे आवाहन करतो, असं क्वाडच्या नेत्यांनी संयुक्त निवेदनात म्हटले आहे.


हेही वाचा : Money Laundering Case: दिल्लीत ईडीची मोठी कारवाई, मंत्री सत्येंद्र जैन यांच्या घरावर छापेमारी