योगाचा उगम नेपाळमध्ये झाला,भारत अस्तित्वातही नव्हता, पंतप्रधान ओलींचा नवा दावा

योगाचा उगम नेपाळमध्ये झाला,भारत अस्तित्वातही नव्हता, पंतप्रधान ओलींचा नवा दावा

योगाचा उगम नेपाळमध्ये झाला,भारत अस्तित्वातही नव्हता, पंतप्रधान ओलींचा नवा दावा

नेपाळमध्ये राजकीय संकटाचा सामना करणाऱ्या पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी आता नवा वाद ओढावून घेतला आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान ओलींनी असा दावा केला आहे की, भारत अस्तित्वात नसताना योगाचा उगम नेपाळमध्ये झाला आहे. जगात योगा आला तेव्हा भारत अस्तिस्वातच नव्हता असा दावा ओली यांनी केला आहे. तसेच पुर्वी ओली यांनी म्हटलं होतं की खरी अयोध्या नगरी ही नेपाळमधल्या बिरगंजमध्ये आहे. भारतातील उत्तर प्रदेशात नव्ह तर भगवान श्रीराम यांचा जन्म बीरगंजमध्ये झाला आहे असं पंतप्रधान ओली यांनी म्हटलं आहे.

नेपाळचे पंतप्रधान केपी शर्मा ओली यांनी अजब दावा केला आहे. योगाचा उगम झाला तेव्हा भारत अस्तित्वात नव्हते. त्यावेळी भारत राजेशाहीमध्ये वाटला गेला होता. नेपाळमधील आयोजित कार्यक्रमात ओली यांनी असं वक्तव्य केल आहे. भारज सत्त वस्तुस्थिती लपवत आहे. कारण त्यावेळी भारताचे तुकडे झाले होते. आंतरराष्ट्रीय योग दिनाची सुरुवात ही २१ जून २०१५ पासू झाली होती. संयुक्त राष्ट्र संघाच्या बैठकीत २०१४ मध्ये याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तेव्हा म्हटलं होतं की २१ जूनला उत्तर गोलार्धात सगळ्यात मोठा दिवस असतो. हा दिवसाला जगात मोठं महत्त्व आहे. ओली यांनी पुर्वी एका कार्यक्रमादरम्यान म्हटलं होतं की, भगवान राम यांचे जन्मस्थान भारतातील अयोध्या नाही तर नेपाळ आहे. खरी अयोध्या ही नेपाळमधील बीरगंजमधील एक गावात आहे. जिथे भगवान राम यांचा जन्म झाला होता.

श्रीराम यांच्या जन्मस्थळाचा वादा दरम्यान साधु-संतांनी ओलींवर पलटवार केला होता. भारतासह नेपाळमधील राजकीय पक्षांनीही ओलींच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केला होता. कम्युनिस्ट पक्षातच अडचणीचा सामना करणारे पंतप्रधान ओली मागील काही काळापासून सातत्याने भारताविरोधी वक्तव्य करत राजकीय पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. यापर्वी नेपाळने नवीन नकाळा जारी करुन भारताचा उत्तराखंड राज्यातील काही भाग नेपाळचा असल्याचा दावा केला होता. या नकाशात लिपुलेख, कलापाणी आणि लिंपियाधुरा नेपाळचा भाग असल्याचा दावा पंतप्रधान ओली यांनी केला होता.

First Published on: June 23, 2021 2:54 PM
Exit mobile version