‘व्हर्जिन मुली सीलबंद बाटलीप्रमाणे’, हे बोलणाऱ्या प्राध्यापकाला हाकलले

‘व्हर्जिन मुली सीलबंद बाटलीप्रमाणे’, हे बोलणाऱ्या प्राध्यापकाला हाकलले

जाधवपूर विद्यापीठाचे प्राध्यापक कनक सरकारला हाकलले

‘व्हर्जिन मुली सीलबंद बाटलीप्रमाणे’ असतात अशी वादग्रस्त पोस्ट टाकणाऱ्या कोलकातामधील जाधवपूर विद्यापीठाच्या प्राध्यापकाची हकालपट्टी करण्यात आली आहे. जाधवपूर विद्यापीठाचे प्राध्यापक कनक सरकार यांच्या फेसबुक पोस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. त्यांच्या पोस्टमध्ये अनेक वादग्रस्त वक्तव्य केली होती. याप्रकरणी महिला आयोगाकडून चौकशी करण्यात येत आहे. जोपर्यंत चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये प्रवेशबंदी करण्यात आली आहे.

अशी केली होती फेसबुक पोस्ट

कोलकातामधील जाधवपूर विद्यापीठाचे प्राध्यापक कनक सरकार या प्राध्यापकाने महिलांच्या कौमार्यासंदर्भात आक्षेपार्ह असे लिहिले होते. ‘तुम्ही कोल्ड ड्रिंकची बाटली किंवा बिस्किट खरेदी करताना सील तुटलेलं’ असेल तर चालेल का? पुढे त्यांनी लिहिलं आहे की, ‘अशी मुलं मूर्ख असतात ज्यांना पत्नी म्हणून कुमारी वधू मिळण्याचा फायदा नसतो’. यावरच ते थांबले नाही तर ते पुढे , असे देखील म्हणाले आहे की, ‘मुलगी जन्माला आल्यापासून सील्ड असते जोपर्यंत ते उघडलं जात नाही, कुमारी मुलीचा अर्थ संस्कृती, मूल्ये तसेच लैगिंक स्वच्छतेसोबत अनेक गोष्टी आहेत. तसेच मुलांसाठी कुमारी वधू एखाद्या परिप्रमाणे असते.’

महिलांच्या अधिकाराबद्दल बोलतो

आपण नेहमीच महिलांच्या अधिकाराबद्दल बोलत असल्याचं कनक सरकार म्हणाला होता. कनक सरकार यांचे म्हटले होते. हे आपले वैयक्तिक मत होतं, असेही तो पुढे म्हणाला. तसेच मी कोणत्याही व्यक्तीविरोधात तसेच कोणत्याही पुराव्याशिवाय काही म्हटलेल नाही. त्याचप्रमाणे मी समाजाच्या चांगल्यासाठीच लिखाण करतो. तसेच यापूर्वी मी अनेकदा महिलांसाठी आणि त्यांची बाजू मांडणाऱ्या अनेक पोस्ट केल्या असून तुम्ही त्या पाहू शकता, असा बचावही कनक यांनी केला आहे.


वाचा – व्हर्जिन मुली सीलबंद बाटलीप्रमाणे; प्राध्यापकाची वादग्रस्त पोस्ट


 

First Published on: January 17, 2019 9:28 AM
Exit mobile version